बापरे ! कोविड मृतांचा आकडा पुन्हा वाढला

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी
पणजीः राज्यात कोरोना संक्रमणाची रोज नवी प्रकरणं समोर येत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. मागच्या 24 तासांतही कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. चिंतेची बाब म्हणजे कोविड बाधितांच्या संख्येसोबत आता मृतांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसतेय. सोमवारी आतापर्यंतचे सर्वाधिक 17 जणांचा कोविडमुळे मृत्यू झालाय.
हेही वाचाः कोरोना हा रोग नाही, हा चीनचा डॅंबिसपणा – संभाजी भिडे
2 दिवसात 31 जणांचा मृत्यू
रविवारी 14 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रविवार आणि सोमवार मिळून एकूण 31 लोकांचा मृत्यू झालाय. आजपर्यंत फक्त कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत होती. पण हळुहळू आता कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसतेय.
हेही वाचाः धड्ड्याम! कोरोनाचा फटका, शेअर बाजार हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळला
6 दिवसात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू
गेल्या 6 दिवसांत राज्यात कोरोना रुग्ण दगावल्याचा आकडा पाहिल्यास धक्कादायक आहे. गेल्या 6 दिवसात जवळपास कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींचा आकडा हा 50 च्या पार गेला आहे. चिंताजनक बाब म्हणजे मृत्यूदराचं प्रमाण वाढत चाललंय. गेल्या 24 तासांत म्हणजेच सोमावारी तब्बल 17 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचाः चिंता वाढली! कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ
सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा आणि हाताची स्वच्छता राखा
सोमवारच्या कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या आकडेवारीमुळे आरोग्य यंत्रणा अजून सतर्क झाली आहे. राज्याचा लसीकरणाचा वेग सरकारने वाढवला आहेच. शिवाय लोकांनीदेखील स्वतःची काळजी घेण्याची गरज आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा आणि हाताची स्वच्छता राखा.
सोमवारी एकूण किती रुग्ण संख्या वाढली याबद्दल सविस्तर वृत्त लवकरच…