सिकेरी गोशाळेतील १६ गायी वीज पडून ठार

शेडचे मोठे नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोलीः निसर्ग कोपला की माणसाचं कसं आणि किती नुकसान होऊ शकतं हे पुन्हा एकदा तौक्ते चक्रीवादळाने दाखवून दिलंय. रविवार राज्यात येऊन धडकलेलं तौक्ते चक्रीवादळ बघता बघता होत्याचं नव्हतं करून गेलं. या चक्रीवादळामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पडझड तर झालीच. पण अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हे चक्रीवादळ स्वतःसोबत घेऊन गेलं. तसंच कोट्यवधी रुपयांचं नुकसानही झालं. शहरी आणि ग्रामिण अशा दोन्ही भागांना या चक्रीवादळाने दणका दिल्यामुळे सगळे हादरलेत. सिकेरी येथील गोशाळेच्या शेडवर रविवारी रात्री वीज पडल्याने 16 गायी ठार झाल्या. तसंच शेड आणि पत्रे उडून गेल्यानं, वृक्ष कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

16 गायी ठार

कमलाकांत  तारी यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी वादळी वारा झाल्याने आणि वीजा चमकताना अचानक वीज कोसळून 16 गायी ठार झाल्या. त्यामुळे मोठी हानी झाली. या गोशाळेत रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारशी गुरांना आणून या ठिकाणी त्यांचं पालन पोषण केलं जातं. 16 गायी दगवल्याने तारी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या वेळी अनेक झाडं पडून शेडचे पत्रे उडून गेल्यानं गोशाळेचंही मोठं नुकसान झाल्याचं तारी यांनी सांगितलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!