कोविड काळात गोव्यातील 11 कुटुंबांनी गमावले 1 पेक्षा जास्त सदस्य

डॉक्टरांची माहीती; गेल्या अकरा महिन्यांमध्ये गोव्यातील 11 कुटुंबांवर दुहेरी आघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोविडमुळे आतापर्यंत गोव्यात 1,274 बळी गेले आहेत. त्यात कितीतरी कुटुंबांनी एकापेक्षा जास्त सदस्यांचे मृत्यू पाहिले असतील. आतापर्यंत एकापेक्षा जास्त सदस्य गमावण्याची वेळ 11 कुटुंबांवर आली आहे, अशी माहिती एका डॉक्टरांनीच दिली आहे.

हेही वाचाः माजी आमदार विनायक नाईक यांचं निधन

जानेवारी ते 2 मे 2021 दरम्यान 535 बळी

जून 2020 पासून गोव्यात कोविडमुळे रुग्णांचा मृत्यू होण्यास सुरुवात झाली. जूनच्या अखेरपर्यंत 1,315 कोविडबाधित गोव्यात सापडले होते आणि चौघांचा मृत्यू झाला होता. जून ते डिसेंबर 2020 या सात महिन्यांमध्ये कोविडचे 739 रुग्ण दगावले होते. त्यानंतर 2021 मध्ये जानेवारी ते 2 मे या चार महिन्यांच्या कालावधीत 535 बळी गेले. या चार महिन्यांत सात कुटुंबांनी एकापेक्षा जास्त सदस्य गमावले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

हेही वाचाः पॉझिटिव्ह बातमी! राज्यात नवे कोविड पॉझिटिव्ह घटले…

आरोग्य आपत्ती नव्हे, महाआपत्ती

गोव्यात सध्या जी कोविडची स्थिती आहे ती फक्त आरोग्य आपत्ती नाही तर महाआपत्ती आहे, असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. करोनामुळे गेल्या अकरा महिन्यांमध्ये गोव्यातील 11 कुटुंबांवर दुहेरी आघात झाला. गेल्या वर्षी चार, तर या वर्षी आतापर्यंत सात कुटुंबांनी प्रत्येकी दोन सदस्य गमावले. एका कुटुंबाने तीन मृत्यू पाहिले आणि त्याच कुटुंबातील अन्य एका सदस्याचा अन्य आजाराने मृत्यू झाला, असे एका ठरावीक कालावधीत चार जणांचे अंत्यसंसस्कार करण्याची वेळ एका कुटुंबावर आली.

कोविडमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त

एका कुटुंबात दोन भावांचा मृत्यू, एका कुटुंबात पहिल्या दिवशी गरोदर महिला आणि दुसऱ्या दिवशी वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली. एका कुटुंबात आजोबा आणि आई, एका कुटुंबात काका, पुतण्या, दोन कुटुंबांमध्ये वडील आणि मुलगा असे कोविडने बळी घेऊन कुटुंबांना उद्ध्वस्त केलं.

3 कुटुंबांनी गमावले 1 पेक्षा जास्त सदस्य

गेल्या चार दिवसांतच तीन कुटुंबांवर एकापेक्षा जास्त सदस्य गमावण्याची वेळ आली. दोन भाऊ, वडील आणि मुलगा गमावण्याची वेळ दोन कुटुंबांवर आली. काही कुटुंबांतील एका सदस्याचे अंत्यसंस्कार पाहणंही नशिबी आलं नाही; कारण एका सदस्याचा मृत्यू झाला त्यावेळी त्याच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य इस्पितळात दाखल होते, अशा दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत.

हेही वाचाः गोव्यातून महाराष्ट्रात जायचा कोरोना रुग्णांचा प्लान फसला!

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचा बळी

दक्षिण गोवा इस्पितळ आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. तशी कबुली डॉक्टरांनी एका पत्राद्वारे दिली आहे. पण या परिस्थितीतही डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी सध्या सक्रियपणे कोविड रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.

OXYGEN
OXYGEN
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!