राज्यात होणार १०० टक्के सेंद्रिय पद्धतीने शेती

कृषीमंत्री कवळेकरांची माहिती; ५०० सेंद्रिय क्लस्टर तयार; केंद्राकडून अजून ५०० ची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात १०० टक्के सेंद्रिय शेती आणणार, त्याची तयारी म्हणून ५०० सेंद्रिय क्लस्टर बनून तयार असून, १३००० शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती पद्धतीचं प्रशिक्षण देऊनही झालं आहे. लागलीच त्यांना सेंद्रिय केमिकल मुक्त सेंद्रीय खत दिलं जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीकडे वळण्यासाठी मदत मिळणार असल्याचं कृषी मंत्री तथा उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू ) कवळेकर यांनी म्हटलं आहे. पर्वरीतील मंत्रालयात परंपरागत कृषी योजनेचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीला कृषी मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषी सचिव कुलदीपसिंह डांगर, कृषी संचालक नेव्हिल आफोंसो, कृषी अधिकारी सजीव मयेकर, चिंतामणी पेर्णी आदी उपस्थित होते.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या खाली

आत्तापर्यंत १३००० शेतकऱ्यांना मिळालं जैविक शेती संबंधी प्रशिक्षण

५०० सेंद्रिय क्लस्टर बनविण्याच्या कामाला २ वर्षांपासून सुरुवात झाली असून, आत्तापर्यंत जवळपास १३००० शेतकऱ्यांना जैविक शेती संबंधी प्रशिक्षण दिलं गेलं आहे. यापुढे त्यांना मोफत सेंद्रिय खत आणि इतर जैविक शेती कारण्यासंदर्भातल्या साधन सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च ५० कोटी रुपये असून, सेंद्रिय मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणं, तसंच मालाचं योग्य विपणन करणं, त्याच बरोबर खरेदीदार विक्रेता मेळावे घडवून आणणं या सारखे उपक्रम या पुढे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कवळेकरांनी पुढे दिली.

हेही वाचाः ‘डेल्टा प्लस’चा महाराष्ट्रातला पहिला बळी रत्नागिरीत

राज्यात ‘निरोगी गोवा, श्रीमंत शेतकरी’ हे कृषी खात्याचे ब्रीद

राज्यातील प्रत्येक गोमंतकीय हा केमिकल फ्री भाजीपाला खाऊन निरोगी राहावा आणि जैविक शेती करून शेतकऱ्याला त्याचा अधीक लाभ व्हावा हे ध्येय आहे. त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न राज्य सरकारने चालवले आहेत. यामध्ये १२ तालुक्यात १२ एफपीओ करणं हाही एक भाग आहे. प्रत्येक एफपीओ ही संस्था शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सहकार पद्धतीचा अवलंब करून चालवायची आहे. त्यामुळे मिळालेल्या लाभांशाचे वाटेकरी शेतकरीच असणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

संजीवनीमध्ये होऊ शकतं ‘इथेनॉल’चं उत्पादन

संजीवनी साखर कारखान्यामध्ये इथेनॉलचं उत्पादन होऊ शकतं का, याची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषिमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, संजीवनी ऊस उत्पादक शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, मुख्य सचिव परिमल राय, कृषी सचिव कुलदीपसिंग गांगर, कृषी संचालक नेव्हिल आफोंसो, संजीवनीचे प्रशासक चिंतामणी पेर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी कृषी खात्यामार्फत झालेल्या सादरीकरणात, संजीवनीचा सर्व आलेख उपथितांसमोर ठेवण्यात आला होता. त्याच बरोबर उसापासून इथेनॉल तयार करण्याचा जो प्रस्ताव समोर आला आहे, त्या संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव केंद्र सरकारकारडे पाठविण्यासाठी रीतसर बनविण्यासाठी आणि इतर बाबी तपासून पाहण्यासाठी एका अनुभवी एजन्सीकडून तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करून घेण्याचं ठरलं. येणाऱ्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हीत जपून,सरकार निर्णय घेणार असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री तथा कृषी मंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी या नंतर बोलताना सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!