#GoaAssembly #Budget2021-22 अर्थ बजेटचा | अर्थसंकल्पातील TOP 10 खर्चिक गोष्टी

सरकारच्या तिजोरीवर ताण टाकणार्‍या घोषणा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बजेट सादर झालं. उशिरा का होईना पण सादर झालेल्या बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या. यातील 10 महत्त्वाच्या घोषणा सरकारसाठी खर्चिक ठरणअयाची शक्यता आहे. नेमक्या अशा कोणत्या घोषणा आहेत, ज्यामुळे खर्च वाढणार आहे, त्यावर एक नजर टाकुयात…

आरोग्य खात्यासाठी 1 हजार 719.98 कोटी रुपयांची तरतूद
कर्करोग रुग्णांचा मेडिक्लेम योजने समावेश होणार, मेडिक्लेम योजनेची उत्पन्न मर्यादा 5 लाखांवर नेणार.

सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी दोन नवे कोर्स, 1.91 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा.

आमदार निधीची घोषणा, आमदार निधीसाठी 100 कोटींची तरतूद.

12,576 कोटींच्या पायाभूत प्रकल्पांची कामं सुरू, तिळारीचं पाणी पाईपलाईनं आणण्यासाठी 122 कोटींची तरतूद.

खासगी बस व्यावसायिकांसाठी 18 कोटी रुपयांची इंधन सबसिडीची तरतूद, जुन्या बस रिप्लेस करण्यासाठी 9 कोटींची तरतूद.

गोवा मेरीटाईम बोर्डसाठी 1 कोटींची तरतूद, सोलर वीज प्रकल्पासाठी 60 कोटींची तरतूद.

16.20 कोटी कोकण मरिटाईन क्लस्टरसाठी केंद्राची मंजुरी
पर्यटन व्यापार सहाय्य योजनेसाठी 25 कोटी रुपयांची तरतुदी.

कृषी श्रेत्रासाठी तब्बल 489.19 कोटी रुपयांची तरतूद, संजीवनी साखर कारखान्यासाठी 15 कोटींची तरतूद, शेतकर्‍यांना आधारभूत किंमत मिळण्यासाठी 15 कोटींची तरतूद

गोशाळा आणि गो संरक्षणासाठी 10 कोटींची तरतूद.
गोव्याला फिशरी हब करण्यासाठी केंद्राकडून 400 कोटींची हमी, मासेमार्‍यांसाठी 14 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा.

शिक्षण खात्यासाठी 3 हजार 38 कोटी रुपयांची तरतूद
सरकारी शाळांत कॉम्प्युटर लॅब, सीएम कोडिंग आणि रोबोटिंग योजनेसाठी 25 कोटींची तरतूद.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!