उसकईत 1 लाखांची सोनसाखळी हिसकावली

गुरुवारची घटना; 1 लाख किमतीची सोनसाखळी चोरीला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः राज्यात चोरीचे प्रकार वाढले आहेत. सासष्टीत सोनसाखळी चोरीचं प्रकरण ताजं असताना गुरुवारी म्हापशातील उसकई येथे अजून एक चोरीचं प्रकरण घडलंय. सासष्टीत चोरी केलेल्या पॅटर्ननुसारत उसकईत सोनसाखळीची चोरी करण्यात आलंय. या चोरीत दोन व्यक्तींचा समावेश असल्याचं तक्रारदाराकडून सांगण्यात आलंय. सकलवाडा उसकई येथे एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः कर्फ्यूत वाढ पण सामान्य गोयकारांना दिलासा !

गुरुवारची घटना

ही घटना गुरूवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. फिर्यादी मारीया पिटर कार्व्हालो (55, सकलवाडा उसकई) ही महिला आपल्या बहिणीसोबत म्हापसा बाजारपेठेत खरेदीसाठी आली होती. सामान खरेदी करून ती स्कुटरवरून घरी गेली. घराबाहेर दुचाकीवरून उतरली असता मागून आलेल्या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरील चोरट्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि दोघे चोरटे भरधाव वेगाने पसार झाले.

हेही वाचाः चेक बाऊन्स होणं हा एक गुन्हा

1 लाख किमतीची सोनसाखळी चोरली

चोरीस गेलेली सोनसाखळी 1 लाखांची असून तिचं वजन 30 ग्रॅम आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरव नाईक करीत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!