पर्वरीत घर फोडून १.८० लाखांचे दागिने लंपास

९ ते ११ सप्टेंबर दरम्यान चोरी; अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: सणासुदीचे दिवस…गणेशोत्सवाची धूम…अन् महिलांची दागिने घालून बाहेर पडण्याची हौस…सारे काही चोरांच्या पथ्यावर पडणारे…म्हणून सर्वांनी घराबाहेर पडताना सावध राहा. तसंच घरात जास्तीचे दागिने किंवा कॅश ठेवू नका. कारण राज्यात चोरी, घरफोडीच्या घटना वाढू लागल्यात. पर्वरी भागात नुकतीच घर फोडून दागिने लंपास केल्याची घटना घडलीये.

नक्की काय झालं?

आल्त पर्वरी येथे घर फोडून चोरट्यांनी १.८० लाखांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रमोद कोनाडकर कुटुंबीय चतुर्थीनिमित्त घर बंद करून गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केली असल्याचं समजतंय.

९ ते ११ सप्टेंबर दरम्यान चोरी

ही चोरी ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान घडली. बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात संशयितांनी आतील कपाटे फोडून १.८० लाखांचे दागिने चोरले असल्याचं तक्रारदाराने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

सावधान! स्वतःची काळजी घ्या

सध्या राज्यात चेन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी, घरफोडी, बॅग लिफ्टींग, मोबाईल चोरीचे प्रकारामध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारचे गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता जनतेनेच स्वतःच काळजी घेवून नुकसान टाळावं. महिलांनी मॉर्निंग वॉक तसंच बाजारात आणि इतर ठिकाणी जाताना परिधान केलेले दागिने हे व्यवस्थित झाकलेले असावेत. शक्यतो मॉर्निग वॉकला जाताना दागिने परिधान करू नयेत. तसंच एकटं जाणं टाळावं. कोणत्याही अनोळखी इसमांसोबत बोलताना दागिन्यांची आणि पर्सची तसंच मोबाईल फोनची काळजी घ्यावी.

हा व्हि़डिओ पहाः GOA GANESH DECORATION | मंदार शेटगावकर यांनी साकारला ‘पुतना वध’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!