५०० कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश व्हावा ! टीसीपी मंत्र्यांकडे सीबीआय आणि ईडी चौकशी करण्याची गोवा टीएमसीची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट 27 जून | एकजुटीचे जोरदार प्रदर्शन करताना , गोवा टीएमसीने शहर आणि नगर नियोजन कायद्याच्या (टीसीपी) -१६ (ब ) आणि गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम विनियम, २०१० च्या -१७ (२) मध्ये प्रस्तावित सुधारणांना विरोध केला. गोवा टीसीपीचे सह -संयोजक समील वळवईकर, ‘एआयटीसी’ चे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजानो डीमेलो आणि आयटी संयोजक तनोज अडवलपालकर यांनी पणजी येथील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांनी ,५०० कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी सीबीआय आणि ईडीची सखोल चौकशी सुरू करण्याची मागणी केली.

गोव्याचे वातावरण बिघवडल्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची निंदा करताना समील वळवईकर म्हणाले, ‘भाजप सरकारने विविध कायद्यात दुरुस्त्या, विशेषत: वादग्रस्त १७ (२) सुधारणा केल्या, ही चिंताजनक बाब आहे. या दुरुस्तीअंतर्गत सर्रासपणे मंजूर झालेल्या जमिनीच्या रूपांतरणामुळे राज्याच्या जडणघडणीला आणि भावी पिढ्यांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे.” ते पुढे म्हणाले, ‘टीएमसीच्या एका शिष्टमंडळाने मोरजी गावाला भेट दिली आणि तब्बल ६०,००० चौरस मीटर जमीन रूपांतरित झाल्याचे पाहिले. जे एकेकाळी निर्मळ पाणवठे, गुरांसाठी आवश्यक चरण्याची ठिकाणे आणि विविध प्रकारच्या वृक्षांची अभिमान बाळगत असलेले एक मौल्यवान पठार धोक्यात आल्याचे आढळून आले.’

Goa Trinamool demands judicial probe into corruption allegations in tourism

१७ (२)दुरुस्तीच्या सभोवतालच्या गंभीर बाबींवर प्रकाश टाकताना, ट्रोजानो डी’मेलो म्हणाले, ‘सुधारणेच्या नावाखाली विनाश झालेला आहे. या दुरुस्तीमुळे गोव्यातील वनजमीन, फळबागा आणि पर्यावरणीय संवेदनशील भाग नष्ट झाले आहेत.’ पुढे ते म्हणाले, ‘यापूर्वी जमीन रूपांतरनाचे निर्णय सर्वसमावेशक आणि सल्लागार प्रक्रियेद्वारे घेतले जात होते. तथापि, १७ (२) दुरुस्तीच्या परिचयाने या प्रक्रियेचे वैयक्तिक-चालित क्रियेत रूपांतर झाले आहे, जेथे निर्णय एकतर्फी घेतले जातात. सल्लागार प्रक्रिया घेण्याऐवजी टीसीपी मंत्री स्वतःहून निर्णय घेत आहेत.’’

टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवताना डिमेलो म्हणाले, ‘सदर मंत्री त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या विरुद्ध, जमिनीचे रूपांतरण करण्यात मग्न असल्याचे दिसून येते.’ ते पुढे म्हणाले, ‘ टीसीपी मंत्र्यासह अनेकांना मंडूर -आजोशी पट्ट्यासारख्या भागातील विनाशकारी परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी,पत्रे लिहिणाऱ्या कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमीच्या अथक प्रयत्नांनंतरही मंत्र्यांचे त्यांच्या मुद्यांकडे दुर्लक्ष केले गेले.’

गोव्याच्या विध्वंसासाठी टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांना जबाबदार धरताना डी’मेलो यांनी सांगितले , ‘राणे यांनी ७ जून रोजी ट्विटरवर आपल्याला धक्का बसल्याचे जाहीर करताना, प्रादेशिक आराखडा- २०२१ ला ‘फसवणूक’ म्हणून लेबल लावले. हे निव्वळ आरोप नसून खुद्द मंत्र्यांनीच बोललेले शब्द आहेत. त्यांनी ‘प्रादेशिक आराखडा- २०२१’ ला एक घोटाळा म्हटले असून जो त्यांना कर्ता-करविता दिगंबर कामत यांच्याकडून वारसा मिळाला आहे . या विषयावर ते गप्प का आहेत ?’ ते पुढे म्हणाले, ‘आम्ही टीसीपी मंत्र्याकडे ५०० कोटींचा घोटाळा उघड करण्यासाठी सीबीआय आणि ईडीकडे तक्रार करण्याची मागणी करतो. विधानसभा सभागृहाच्या पटलावर मांडून हे करता येणार नाही, कारण याआधी असे असंख्य मुद्दे मांडले गेले आहेत आणि तरीही विसरले गेले आहेत.’

एकजुटीचे जोरदार प्रदर्शन करताना , गोवा टीएमसीने शहर आणि नगर नियोजन कायद्याच्या (टीसीपी) -१६ (ब ) आणि गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम विनियम, २०१० च्या -१७ (२) मध्ये प्रस्तावित सुधारणांना विरोध केला. गोवा टीसीपीचे सह -संयोजक समील वळवईकर, ‘एआयटीसी’ चे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजानो डीमेलो आणि आयटी संयोजक तनोज अडवलपालकर यांनी पणजी येथील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांनी ,५०० कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी सीबीआय आणि ईडीची सखोल चौकशी सुरू करण्याची मागणी केली.

गोव्याचे वातावरण बिघवडल्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची निंदा करताना समील वळवईकर म्हणाले, ‘भाजप सरकारने विविध कायद्यात दुरुस्त्या, विशेषत: वादग्रस्त १७ (२) सुधारणा केल्या, ही चिंताजनक बाब आहे. या दुरुस्तीअंतर्गत सर्रासपणे मंजूर झालेल्या जमिनीच्या रूपांतरणामुळे राज्याच्या जडणघडणीला आणि भावी पिढ्यांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे.” ते पुढे म्हणाले, ‘टीएमसीच्या एका शिष्टमंडळाने मोरजी गावाला भेट दिली आणि तब्बल ६०,००० चौरस मीटर जमीन रूपांतरित झाल्याचे पाहिले. जे एकेकाळी निर्मळ पाणवठे, गुरांसाठी आवश्यक चरण्याची ठिकाणे आणि विविध प्रकारच्या वृक्षांची अभिमान बाळगत असलेले एक मौल्यवान पठार धोक्यात आल्याचे आढळून आले.’

१७ (२)दुरुस्तीच्या सभोवतालच्या गंभीर बाबींवर प्रकाश टाकताना, ट्रोजानो डी’मेलो म्हणाले, ‘सुधारणेच्या नावाखाली विनाश झालेला आहे. या दुरुस्तीमुळे गोव्यातील वनजमीन, फळबागा आणि पर्यावरणीय संवेदनशील भाग नष्ट झाले आहेत.’ पुढे ते म्हणाले, ‘यापूर्वी जमीन रूपांतरनाचे निर्णय सर्वसमावेशक आणि सल्लागार प्रक्रियेद्वारे घेतले जात होते. तथापि, १७ (२) दुरुस्तीच्या परिचयाने या प्रक्रियेचे वैयक्तिक-चालित क्रियेत रूपांतर झाले आहे, जेथे निर्णय एकतर्फी घेतले जातात. सल्लागार प्रक्रिया घेण्याऐवजी टीसीपी मंत्री स्वतःहून निर्णय घेत आहेत.’’

टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवताना डिमेलो म्हणाले, ‘सदर मंत्री त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या विरुद्ध, जमिनीचे रूपांतरण करण्यात मग्न असल्याचे दिसून येते.’ ते पुढे म्हणाले, ‘ टीसीपी मंत्र्यासह अनेकांना मंडूर -आजोशी पट्ट्यासारख्या भागातील विनाशकारी परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी,पत्रे लिहिणाऱ्या कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमीच्या अथक प्रयत्नांनंतरही मंत्र्यांचे त्यांच्या मुद्यांकडे दुर्लक्ष केले गेले.’

गोव्याच्या विध्वंसासाठी टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांना जबाबदार धरताना डी’मेलो यांनी सांगितले , ‘राणे यांनी ७ जून रोजी ट्विटरवर आपल्याला धक्का बसल्याचे जाहीर करताना, प्रादेशिक आराखडा- २०२१ ला ‘फसवणूक’ म्हणून लेबल लावले. हे निव्वळ आरोप नसून खुद्द मंत्र्यांनीच बोललेले शब्द आहेत. त्यांनी ‘प्रादेशिक आराखडा- २०२१’ ला एक घोटाळा म्हटले असून जो त्यांना कर्ता-करविता दिगंबर कामत यांच्याकडून वारसा मिळाला आहे . या विषयावर ते गप्प का आहेत ?’ ते पुढे म्हणाले, ‘आम्ही टीसीपी मंत्र्याकडे ५०० कोटींचा घोटाळा उघड करण्यासाठी सीबीआय आणि ईडीकडे तक्रार करण्याची मागणी करतो. विधानसभा सभागृहाच्या पटलावर मांडून हे करता येणार नाही, कारण याआधी असे असंख्य मुद्दे मांडले गेले आहेत आणि तरीही विसरले गेले आहेत.’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!