हणजूण पोलिसांनी मानवी तस्करी, वेश्याव्यवसायप्रकरणी केली एकास अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट: राज्यात अजूनही राजरोसपणे वेश्याव्यवसाय सुरू आहे, यावर शिक्कामोर्तब करणारी एक घटना आज समोर आली आहे. हणजूण पोलिसांनी तस्करी आणि वेश्याव्यवसाय प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

आज 8 जुलै रोजी एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापा टाकण्यात आला आणि एका आरोपीला एका ग्राहकाला मुलगी पुरवण्यासाठी आला असता रंगेहात पकडण्यात आले.
आरोपीचे नाव श्री. दीपू यादव, वय 25 वर्ष रा. विल- सूरजबल्ली पूर्वा, पोस्ट- रायपूर, पीएस- रामगंज, जिल्हा- बहिराईच, उत्तर प्रदेश असून तो सध्या रिसॉर्ट डी क्रॉसरोड, फुटबॉल ग्राउंड जवळ, कळंगुट-बार्देश येथे वास्तव्यास होता.

कलम 370 (A) IPC आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 4 आणि 5 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. आरोपी व्यक्ती मुलीचा ग्राहकांना पुरवठा करत असल्याचे आणि त्या मुलीच्या कमाईवर गुजराण करत असल्याचे आढळून आले.
सुटका करण्यात आलेल्या पीडित मुलीला सुरक्षित कोठडीसाठी संरक्षण गृहात पाठवण्यात आले आहे. एसपी उत्तर शिवेंदू भूषण आयपीएस आणि एसडीपीओ जीवबा दळवी यांच्या देखरेखीखाली पीआय प्रशाल एन देसाई यांच्याकडे पुढील तपास सुरू आहे