‘स्मार्ट सिटीच्या नावाने स्मार्ट स्कॅम’ ! पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पात भ्रष्टाचाराचा काँग्रेसचा आरोप

स्मार्ट सिटीयोजनेंतर्गत निकृष्ट काम करण्यात आले असून मंडळाच्या सदस्यांनी 1110 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे आरोप एल्विस गोम्स यांनी केले आहेत.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट, पणजी : पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSCDL) ने आपल्या स्थापनेपासून स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पणजी शहरात 950.34 कोटी रुपयांचे 47 प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यापैकी 58.15 कोटी रुपयांचे 15 प्रकल्प पूर्ण झाले असले तरी या योजनेत घोटाळा झाल्याचे काँग्रेसचे मत आहे. पणजी स्मार्ट सिटीच्या नावाखाली निकृष्ट काम झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासोबतच या योजनेत गुंतवलेल्या करदात्यांच्या पैशांचीही खुलेआम लूट करण्यात आली आहे असाही घणाघाती आरोप त्यांनी केलाय.

प्रकल्पाच्या नावाखाली पैशांची लूट केली जात आहे

काँग्रेस नेते एल्विस गोम्स म्हणाले की, पणजीचे भाजप आमदार आणि महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनीही पणजी ‘स्मार्ट सिटी’चे सुरू असलेले काम निकृष्ट असल्याचे मान्य केले आहे. गोम्स म्हणाले की, जेव्हा सरकारच काम निकृष्ट असल्याचे सांगत असते, तेव्हा सरकार भ्रष्टाचार कबूल करते तेव्हा संबंधितांवर एफआयआर दाखल करायला हवा. स्मार्ट सिटीचे काम करताना जनतेच्या पैशाची खुलेआम लूट केली जात असल्याचा आरोप गोम्स यांनी केला. मोन्सेरात आणि इतर ज्यांचा सहभाग या स्मार्ट घोटाळ्यात आहे त्यांची चौकशी झालीच पाहिजे. गोम्स पुढे म्हणाले की, न्यायालयीन चौकशीतून हा घोटाळा उघडकीस येण्याची अपेक्षा आहे.

Panaji Smart City (@ImaginePanaji) / Twitter

प्रश्न विचारूनही माहिती देण्यात आली नाही – गोम्स

गोम्स यांनी असे निदर्शनास आणून दिले की जेव्हा इतके मोठे प्रकल्प हाती घेतले जातात तेव्हा या घडामोडींची माहिती जनतेला देणे हे संबंधित मंडळाचे कर्तव्य आहे. आम्ही त्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत 50 प्रश्न विचारले, पण एकही उत्तर मिळालेले नाही. ते म्हणाले की आम्ही नियंत्रक महालेखा परीक्षकांना विशेष लेखापरीक्षण करण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला. करदात्याचा पैसा दिवसाढवळ्या लुटला जातो. सरकार यावर काय कारवाई करणार असा खोच सवाल त्यांनी विचारला.

‘केंद्राकडून होत आहे हस्तक्षेप’

गोम्स यांनी आरोप केला की जेव्हा प्रकल्पांतर्गत केलेल्या विकासासाठी प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत, तेव्हा याचा अर्थ केंद्राचा थेट हस्तक्षेप आहे असाच निघतो. कंपनीचे रजिस्ट्रार देखील वार्षिक रिटर्न भरण्यात अपयशी ठरलेले असतानाही संचालक मंडळ त्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरले असून त्यांना निलंबित करण्यात यावे, असे ते म्हणाले.

पावसाळ्यातही पणजीत वाहने रुतण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज | During the  rainy season, there will be vehicle jams on the Panaji road | Dainik  Gomantak

1,110 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे

1,110 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे असा घणाघाती आरोप करत काँग्रेसने या योजनेची न्यायालयीन अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. काँग्रेस नेते एल्विस गोम्स, सरचिटणीस विजय भिके, उत्तर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर इत्यादि यांनी काँग्रेस सभागृहात पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड’चे संचालक मंडळच 1,110 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!