सेसा गोवाच्या 250 कामगारांना नोटिस ! नोकऱ्या गेल्यात जमा

विनायक सामंत | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट, 25 जून : सेसा कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कंपनी ने कामगारांच्या खात्यावर एक रकमी रक्कम जमा करत नोटीसा काढल्या आहेत. त्यामुळे त्या २५० कामगारांच्या नोकऱ्या गेल्यात जमा आहे.
यासाठीच शनिवारी संध्याकाळी एम्प्लॉईज युनियन ऑफ सेसा मायनिंग वर्कर्स च्या कामगारांनी तडकाफडकी डिचोली नगरपालिका आणि डिचोली चे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत कामगारांनी आपल्या समस्या आणि कैफियात आमदारांसमोर मांडली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन त्यांनी सांभाळले नाही. मुख्यमंत्र्यांनी कामगारांना हमी दिला होती की खाणी सुरू झाल्या तर जुन्या आणि स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यात येईल परंतू खाण कंपनी ने तसे न करता उलट कामगारांना कामावरून काढून टाकले. जर आम्हाला कामावर रूजू करून घेतले नाही तर आम्ही आमच्या कुटुंबासहीत रस्त्यांवर उतरणार असल्याचा इशारा कामगारांनी सरकार ला दिला आहे.

यावेळी डिचोलीचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांनी कामगारांची समजूत काढण्याचा केला. यावेळी ते म्हणाले की आपण मुख्यमंत्र्या़शी याबाबत चर्चा करून त्यावर तोडगा काढू. आपण सर्वतोपरी कामगारांसोबत आहे. कामगारांसाठी गरज पडल्यास सरकारच्या विरोधात जाऊन भुमिका घेण्यास तयार असल्याचे डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.