सेवा, सुशासन, जनकल्याण या त्रीसुतीच्या माध्यमाने समाजातील विविध घटकांतले अंतर सांधले जाणार

ऋषभ | प्रतिनिधी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते 24 एप्रिल 2023 रोजी “सेवा, सुशासन, जनकल्याण” चा भाग म्हणून पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षाला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींचा प्रवास सुलभ करण्यासाठी राज्य दिव्यांगजन आयोग व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा सेवा सुरू करत आहे. व्हीलचेअर टॅक्सी सेवांमध्ये अग्रणी असलेल्या ईजी मूव द्वारे हे व्यवस्थापित केले जाईल.

कामाच्या ठिकाणी, रुग्णालये, शाळा आणि इतर ठिकाणी प्रवास करताना व्हीलचेअर वापरणाऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी आयोग ही सेवा सुरू करत असल्याची माहिती राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली.

दिव्यांग तसेच वयस्कर प्रतिनिधींना मदत करण्यासाठी, पर्पल फेस्ट दरम्यान राज्यात प्रथमच व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षांचे अनावरण करण्यात आले होते. पर्पल फेस्टमध्ये मोठ्या संख्येने राज्यातील दिव्यांग प्रतिनिधी सहभागी झाले होते आणि अशा रिक्षा राज्यात वर्षभर उपलब्ध झाल्या तर फारच सुलभ होईल, असे प्रतिनिधींनी त्यांनी व्यक्त केले होते.
या वाहनात दोन सदस्य दिव्यांग प्रवाशासोबत जाऊ शकतात. या रिक्षामध्ये चढताना रिक्षाचा मागचा दरवाजा रॅम्प मध्ये रूपांतरीत होतो. याशिवाय, सुरक्षिततेला अत्यंत महत्त्व दिले असून व्हीलचेअरसाठी चारही बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली.
