‘सुबह का भुला..’ राज्यसभा खासदार लुईझिन फालेरोंचा राजीनामा, फालेरोंच्या मनात नेमके शिजतेय तरी काय ?

राज्यसभा खासदार लुईझिन फालेरोंच्या राजीनाम्याने गोव्याचे सुप्त राजकारण पुनः जागे झाले आहे, विविध राजकीय घडामोडींकरीता सदर घटना 'ढकल स्टार्ट' ठरणार यात शंकाच नाही

ऋषभ | प्रतिनिधी


पणजी, 11 एप्रिल 2023 : आजच्या दिवसाची सुरवात तशी थंडच झाली पण दुपार होता होता वातावरण तापले आणि नव्या वणव्याने पेट घेतला. तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार लुईझिन्हो फालेरो यांनी आज वैयक्तिक कारणास्तव राज्यसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री फालेरो टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर लगेचच नोव्हेंबर 2021 मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते.

टीएमसी हायकमांडचा ‘यासाठी’ दबाव आणि फालेरोंचा राजीनामा

त्यांचा राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळाच्या तीन वर्षे सात महिने अगोदर स्वीकारला. फातोर्डा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर टीएमसी हायकमांडचा दबाव होता. विधानसभा निवडणूक न लढवण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीएमसी नेतृत्व नाखूष होते आणि त्यांनी 71 वर्षीय दिग्गज राजकारण्यापासून अंतर ठेवले होते. राज्यसभेवर फालेरो यांच्या जागी कोण येणार यावरून राजकीय वर्तुळात अटकळ सुरू आहे. टीएमसीने एका प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे की “एआयटीसी निवडणुकीची अधिसूचना मिळेल तेव्हा जागेसाठी नवीन उमेदवार घोषित करेल”.

Luizinho Faleiro: TMC के लुइजिन्हो फलेरियो ने राज्यसभा सांसद पद से दिया  इस्तीफा, पार्टी सूत्रों ने दी जानकारी - TMCs Luizinho Faleiro resigns as  Rajya Sabha MP party sources informed

EXPLAINERS SERIES | भारताच्या पूर्व-पश्चिम किनार्‍यावर उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा वाढता धोका

लुइझिन्हो फालेरो यांच्या राज्यसभेच्या राजीनाम्यावर पक्षाचे विधानः

आम्ही श्री. लुइझिन्हो फालेरो यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. आम्ही प्रामाणिकपणे आशा करतो की ते गोव्यातील लोकांची अथक सेवा करत राहतील आणि राज्याची अधिक प्रगती आणि प्रगती साधण्यासाठी प्रयत्नशील राहतील. AITC निवडणुकीची अधिसूचना मिळेल तेव्हा जागेसाठी नवीन उमेदवार घोषित करेल.

लुईझिन फालेरोंनी खासदारकीचा राजिनामा दिल्यानंतर आणि टीएमसीला रामराम केल्यानंतर राजकीय हालचाली गतीमान होताना दिसतायत . कॉंग्रेस गोवा प्रभारी मणीकम टागोर तातडीने गोव्यात दाखल होणार आहेत . लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना महत्व आले आहे.

सुबह का भुला अगर शाम को वापस आये तो उसे भुला नही कहते !

गोवन वार्ता लाईव्हचे चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी राज्यसभेचे खासदार (माजी !) लुईझिन फालेरों यांच्याशी संपर्क साधला असता फालेरो यांनी, आपल्याला अनेक पक्षांकडून ऑफर्स येतायत असे दिलखुलासपणे सांगितले. पण तूर्तास आपला कोणत्याही पक्षासोबत जाण्याचा काही प्लान नाही असेही त्यांनी छातीठोकपणे सांगितले. येत्या निवडणुकीत पुन्हा नव्या जोमाने उतरणार का ? असा थेट सवाल केला असता त्यांनी हसत त्यावर उत्तर देणे टाळले.

पण काहीही असो, जे गोयंकार फालेरोंच्या राजकारणाची तऱ्हा जाणून आहेत त्यांना माहीत आहे की फालेरो काही राजकारणातून निवृत्ती घेऊन उरलेले आयुष्य पेन्शन घेत बसणाऱ्यातले नक्कीच नाहीत. ते पुनः नव्या जोमाने कामाला लागतील. फालेरो पुन्हा एकदा कॉँग्रेसच्याच हातात हात देतात का ? आता हेच पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे. आणि गोव्याच्या राजकारणाचा इतिहास पाहता “सुबह का भुला अगर शाम को वापस आये तो उसे भुला नही कहते” या उक्तीचा अनेकदा प्रत्यय गोंयकरांना आलेला आहे.

एरव्ही तेच तेच जूनाट विषय चघळून कंटाळलेल्या गोंयकरांना काही दिवसांसाठी नवीन च्युइंग गम मिळालेय हे मात्र खरे. आता गोव्याच्या राजकारणाच्या शिडात हे जे नवीन वारे शिरले आहे ते कोणत्या दिशेने आपल्याला घेऊन जाते हे येणाऱ्या काहीच महिन्यात सर्वज्ञात होईल. तो पर्यन्त वाट बघा !

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!