सुजलाम सुफलाम ..|यंदा तांदळाचे लक्षणीय पीक, तर तेलबियांसोबत डाळींच्या लागवडीत घट, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या रिपोर्टमधील हे आकडे वाचा

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 12 सप्टेंबर | देशात यावर्षी खरीप पिकांच्या लागवडीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत देशात 1 हजार 88 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये तांदूळ लागवडीनं आघाडी घेतली आहे. आत्तापर्यंत 403.41 लाख हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. मागील वर्षाचा विचार केला तर यावर्षी तांदळाच्या लावडीच वाढ झाली आहे. 2022 मध्ये 392.81 लाख हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड करण्यात आली होती.

भरड धान्याच्या लागवडीतही वाढ
केंद्रीय कृषी मंत्रालयानं यावर्षीच्या पिकांच्या लागवडीची माहिती दिली आहे. यामध्ये तांदळाच्या लागवडीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर भरड धान्याच्या लागवडीत देखील थोडी वाढ झाली आहे. यावर्षी 182 लाख हेक्टरवर क्षेत्रावर भरड झान्याची लागवड झाली आहे. तर 59.91 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही पिकांच्या लागवडीत वाढ झाली आहे, तर काही पिकांच्या लागवडीत घट झाली आहे.

डाळींसह तुरीच्या लागवडीत घट
कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागीव वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या डाळींच्या लागवडीत घट झाली आहे. यावर्षी 119.91 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड करण्यात आली आहे. तर मागील वर्षी 131.17 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड करण्यात आली होती. तूरीच्या लागवडीत देखील घट झाली आहे. यावर्षी 42.92 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली आहे. तर मागील वर्षी 45.61 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली होती. उडीदाटी 31.89 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तर 31.11 लाख हेक्टर क्षेत्रावर मुगाची लागवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे.

नाचणीसह मका लागवडीत वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या लागवडीत देखील घट झाली आहे. यावर्षी 14.08 लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी 15.58 लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्यात आली होती. बाजरीच्या लागवडीत मात्र किंचीत वाढ झाली आहे. यावर्षी 70.84 लाख हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी 70.46 लाख हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड करण्यात आली होती. नाचणी 8.73 लाख हेक्टर, मका 83.33 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मका लागवडीत वाढ झाली आहे. मागीव वर्षी 80.97 लाख हेक्टर क्षेत्रावर मकेची लागवड झाली होती.

तेलबियांच्या लावडीत घट तर ऊसाच्या लागवडीत वाढ
तेलबियांच्या लावडीत देखील थोडी घट झाली आहे. यावर्षी 191.49 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील वर्षी 193.30 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. ऊसाच्या लागवडीत देशात यंदा वाढ झाली आहे. यावर्षी 59.91 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी 55.65 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली होती. तर कापसाच्या लागवडीत किंचीत घट झाली आहे. यावर्षी 125 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी 126.87 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती.
