साहित्य वार्ता | “अशोक बोरकर: काव्यमैफल ” कवी कवयित्रींच्या कवितांनी रंगली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट : मडगाव येथील मंथन सभागृहात “ अशोक बोरकर : काव्यमैफल “ आषाढ पावसात हास्याचे तुषार फुलवून गेली . या 217व्या बहुभाषिक काव्यमैफलीत अनेक कवी कवयित्रींच्या उत्तम कवितांची बरसात झाली.

ॲड .संतोष तिंबलो यांनी सादर केलेल्या “ मी हो हो म्हणत राहिलो “ या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपली दाद दिली. विराज देसाई यांनी सादर केलेली “ घटस्फोट “ ही कविता जीवनाचा गर्भितार्थ सांगून गेली. पंढरीनाथ लोटलीकर ( पावसाक चढलो तोरो ) उदय गुडे ( आषाढ पावळी )तसेच विश्वनाथ स्वार ( पावसाचे गीत ) . अभय सुराणा ( शादीका प्रस्ताव ( राजस्थानी गीत ) या कविता लक्षवेधक होत्या. राजेंद्र मेंगाने यांनी सादर केलेली ( म्हणून तब्येती बिघडतात ) ही कविता जीवन कसे हसत खेळत जगावे हे शिकवून गेली तर प्रसाद सावंत यांच्या “ भ्रम “ या कवितेने उपस्थितांत हास्याची खसखस पिकवली. रूपेश देसाई यांनी “ तुझे बगर जगू येतां “ या कवितेवर उपस्थितांनी ठेका धरून मैफलीला रंगत आणली.

काव्यमैफलीत सहभागी झालेले कवी कवयित्री

प्रथन सावंत ( वर्क ), मंजूषा तळावलीकर ( मेघमल्हार ), उषा कामत ( भित्रुड हांयस ), स्मिता कारे ( पाऊस ), प्रसाद सावंत ( रामगीता ), स्ंनेहा केणी ( लावण्यवती ) ,डॉ. शामा सिंगबाळ ), कविता आमोणकर ( तुझी कविता), शर्मिला प्रभू ( एक कविता /बालपणीचा पाऊस ), वल्लभ दुभाषी ( टकीला शोट्स ), उमेश शिरगुप्पे ( व्यथा वार्धक्यातली ), बबीता नार्वेकर ( फुलां ), अजय जेवळीकर (एक कविता), रूपेश देसाई ( गझल ), शीला काकोडकर ( फजिती ) यांनी कविता सादर केल्या. उषा कामत यांनी गाऊन सादर केलेल्या फुगडी गीतावर काव्यमैफलीच्या सदस्यांनी फुगडी सादर करून रंगत आणली. रजनी रायकर यांनी उपस्थित राहू न शकल्याने त्यांची “ विचार “ ही कविता स्मिता कारे यांनी सादर केली.

सुरवातीला प्रसाद सावंत यांनी काव्यमैफलीचे जनक अशोक बोरकर यांच्या स्मृती जागवताना काव्यमैफल अव्याहतपणे चालू ठेवल्याबद्द्ल कविता अशोक बोरकर यांचे आभार मानले. तर उमेश शिरगुप्पे यांनी “ मेघांनो तुम्ही कुठे चाललात “ ही कविता अशोक बोरकर यांना समर्पित केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कारे यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!