श्रीमंत पर्यटक पाहिजेत, रस्त्याशेजारी जेवण करणारे नको

मागील कित्येक वर्षे मागणी होत असलेलं पर्यटन धोरण राज्य सरकाराने मंजूर केलं. पर्यटन धोरण 2020 अंतर्गत टुरिझम बोर्डची स्थापना होणार आहे.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाने बुधवारी पर्यटन धोरण 2020ला मान्यता दिली. या धोरणा अंतर्गत टुरिझम बोर्डची स्थापना होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगांवकरांनी दिली. गोव्याची संस्कृती आणि गोंयकारपण जागतिक पातळीवर पोचविण्यासाठी काम करणार असल्याचे मंत्री आजगांवकरांनी सांगितले.

पर्यटन धोरण 2020 अंतर्गत टुरिझम बोर्डची स्थापना करण्यात येणार आहे. गोव्याचं पर्यटन मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यांपुरतच मर्यादित उरलं आहे असं मंत्री बाबू आजगांवकर म्हणाले. या नव्या धोरणात हेरिटेज टुरिझम, इको टुरिझम, हिंटरलॅण्ट टुरिझम, एज्युकेशन टुरिझम, अॅडवेंचर टुरिझम, स्पोर्ट्स टुरिझम या सगळ्यांवर भर देणार असल्याचं आजगांवकर म्हणाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतानी पर्यटन धोरण 2020 मंजूर करुन एक चांगला निर्णय घेतला आहे अशा शब्दात मंत्री आजगांवकरांनी त्यांच कौतुक केलं.

टुरिझम बोर्ड घेणार निर्णय
राज्यात पर्यटनवाढीसाठी ज्या साधनसुविधांची निर्मिती आवश्यक असेल ती मास्टरप्लॅनप्रमाणे केली जाईल. त्या संबंधीचा निर्णय टुरिझम बोर्ड निर्णय घेणार असल्याचं आजगांवकरांनी सांगितल. टुरिझम बोर्डवर तज्ञांची नेमणूक केली जाईल. त्या तज्ञांच्या शिफारसीवरूनच सरकार साधनसुविधांची निर्मिती करणार. गरज पडल्यास जिथे सरकारला शक्य नसेल तिथे पीपीपी तत्वावर प्रकल्प हाती घेऊ अशी माहिती मंत्री आजगांवकरांनी दिली.

श्रीमंत पर्यटक पाहिजेत
गोव्याला श्रीमंत पर्यटकांची गरज आहे, रस्त्याशेजारी जेवण करणाऱ्यांची नाही, अशा शब्दात आजगांवकरांनी आपली भूमिका मांडली. ड्रग्ससाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना आळा घालणे आवश्यक असल्याचे आजगांवकर म्हणाले. पर्यटन धोरण 2020 राज्यातील सगळ्या घटकांचा विचार करुन करण्यात आलं असल्याने ते 100 टक्के यशस्वी होणार असल्याचा विश्वास मंत्री आजगांवकरांनी व्यक्त केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!