‘रोटरी क्लब ऑफ फोंडा’चा 13 वा वार्षिक जनरेशन इन्स्टॉलेशन सोहळा साजरा
अध्यक्ष रोटेरीयन आशुतोष खांडेकर यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर यांनी त्यांच्या बीओडी टीमची ओळख करून दिली

Goan Varta Live | प्रतिनिधी
1 जुलै 2023 रोजी मेनिनो एक्झिक्युटिव्ह फोंडा येथे रोटरी क्लब ऑफ फोंडा तर्फे 13 वा वार्षिक न्यू जनरेशन इन्स्टॉलेशन सोहळा आयोजित करण्यात आला.

समारंभात आशुतोष खांडेकर यांनी 2023-24 या वर्षासाठी क्लबच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. रोटेरीयन डॉ. लेनी दा कोस्टा यांना इंस्टॉलेशन अधिकारी म्हणून असिस्टंट गव्हर्नर रोटेरीयन राधा लवांडे यांच्यासह आमंत्रित केले होते.
क्लबचे अध्यक्ष रोटेरीयन आशुतोष खांडेकर यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर यांनी त्यांच्या बीओडी टीमची ओळख करून दिली. या सोहळ्याला विविध रोटरी क्लबचे अतिथी रोटेरियनही उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते आणि या भव्य सोहळ्यानंतर फेलोशिप डिनरचे आयोजन करण्यात आले.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.