राज्य सरकारकडे संजीवनी कामगारांसाठी निधी नाही, योजनाही नाही, ही चींतेची बाब :- मनोज परब

Goan Varta Live | प्रतिनिधी
काही दिवसापूर्वी उसगाव इथल्या संजीवनी साखर कारखाना बंद करण्यात येणार असून कारखान्यातील १७७ कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची वृत्तपत्रामधून बातमी आली होती. याच विषयी अधिक जाणून घेण्यासाठी रेव्होलुशनरी गोवन्स चे प्रमुख मनोज परब यांनी त्या कामगारांची भेट घेतली होती.
काल पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज परब यांनी याबद्दल माहिती दिली. संजीवनी साखर कारखान्यात हे कामगार सुमारे २०-२५ वर्षे काम करत आले आहे. मागील तीन वर्षापासून हा संजीवनी कारखाना कृषी खाते बघत आले आहे. सरकारकडून ह्या कारखान्यातील कामगारांना पगार देण्यासाठी पॅकेज मिळत होते. जेव्हा ह्या कामगारांच्या नोकरी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृषी खात्याच्या प्रमुखाशी बोलले असता, सरकारकडे त्यांना आता पगार देण्यासाठी निधी उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात येत असून ही चिंतेची बाब असल्याचे परब म्हणाले.
आज राज्य सरकार विविध कार्यक्रमावर तसेच विविध योजनांवर, प्रकल्पावर, ज्यांचा कोणालाच फायदा नसतो, तिकडे करोडो रुपये खर्च करीत असतात, परंतु संजीवनी साखर कारखान्या सारख्या प्रकल्पावर कुणीच लक्ष देत नाही.त्या संजीवनी साखर कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांचे हाल कोणीच बघत नाही. आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाना बंद केला जाणार. ह्या बातामिनेच ते भयभीत झाले आहे. सरकारने हा विषय व्यवस्थित पणे समजून घेवून त्यावर तोडगा काढावा, ह गोवा, ह गोवेकर जर स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे तर आधी राज्य सरकारने, हे डबल इंजिन सरकारने त्या कारखान्यातील कामगारांना न्याय द्यावा, अशी विनंती परब यांनी केली आहे.