राज्य दिव्यांगजन आयोगातर्फे फुलराणी किनळेकर यांना कृत्रिम अवयव प्रदान

ऋषभ | प्रतिनिधी

कोरगाव येथील रहिवासी फुलराणी किनळेकर या दिव्यांग व्यक्तीला राज्य दिव्यांगजन आयोगाने
रोटरी क्लब ऑफ पर्वरी आणि रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिट यांच्या सहकार्याने कृत्रिम अवयव प्रदान करणयात आले.

फुलराणी केरकर यांनी राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांचे आभार मानले. कृत्रिम पाय प्रदान करण्यापूर्वी मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता नवीन कृत्रिम अवयवामुळे मी स्वतंत्र जीवन जगत आहे, किनळेकर यांनी सांगितले.
फुलराणी किनळेकर यांना कृत्रिम पाय मिळावे यासाठी राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने तिच्या संपर्कात होते. राज्य दिव्यांगजन आयोगाकडून दोन महिन्यांपूर्वी प्रदान करण्यात आलेल्या कृत्रिम पायाच्या आधारे पर्पल फेस्ट दरम्यान आयोजित फॅशन शोमध्ये किनळेकर यांनी भाग घेतला होता. यावेळी अनेकांनी त्यांचे भरभरून कौतुकही केले होते.

दिव्यांग व्यक्तींनाही स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी गतवर्षापासून राज्य दिव्यांगजन आयोगाने गरजू दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव प्रदान करण्याचा पुढाकार घेतला आहे. आयोगाच्या या पुढाकारामुळे अनेक दिव्यांग व्यक्ती स्वतंत्रपणे जीवन जगत आहे.