राज्यातल्या रस्त्यांवर दुर्दैवाचे सावट ? काणकोणांत लक्झरी बसची दुचाकीला जोरदार धडक; दाम्पत्यावर काळाचा घाला

काणकोणच्या गुळे भागात पुनः भीषण अपघात घडल्याने चापोली येथील दांपत्याने आपला जीव गमावला.

Goan Varta Live | प्रतिनिधी

काणकोण : गोव्यातील आपघातांची मालिका काही संपायची चिन्हे दिसत नाहीत. रविवारी झालेल्या दुर्घटनेनंतर आज मंगळवारी 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी काणकोणच्या गुळे भागात पुनः भीषण अपघात घडल्याने चापोली येथील दांपत्याने आपला जीव गमावला.

सदर अपघात मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास झाला. कारवारहून काणकोण दिशेने येणाऱ्या भरधाव लक्झरी बसने गेळेहून चापोलीस जाणाऱ्या दाम्पत्यास जोरदार धडक दिल्याने, दुचाकी मागे बसलेल्या प्रियांका वागोंनकर हिचा जागीच मृत्यु झाला. तर दुचाकीचालक पायक वागोंनकर यास इस्पितळात नेताना मृत्यूने गाठले. तसेच लक्झरी बसमधील काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी आपघाताचा पंचनामा करून पुढील कारवाईस हात घातलेला आहे. सदर बस भरधाव वेगात असल्याची प्रथमदर्शी माहिती समोर येत आहे. या रस्त्यावर या आधीही असे अनेक भीषण अपघात घडल्याचे स्थानिकांकडून समझले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून दर दिवशी होणारे अपघात रोखण्यात भूमिका वठवावी असे एका हवालदिल ग्रामस्थाने मत नोंदवले. रस्त्यांवरून ये जा करणाऱ्या अवजड वाहनांनी सुद्धा बाकी प्रवाश्यांची तमा जरा तरी बाळगावी अन्यथा हे अपघात काही संपणार नाहीत अशी पुस्ती अन्य एका नागरिकाने जोडली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!