रस्त्यावरील मरण वाढता वाढता वाढे.. वास्कोत कदंबाच्या चाकाखाली दोघांना मृत्यूने गाठले; तर एकटा गंभीर जखमी

दर दिवशी गोव्यात भीषण अपघात घडतायत. आणि त्यास कारणीभूत ठरतोय तो मुख्यत्वे वाहनचालकांचा बेजवाबदारपणा.

ऋषभ | प्रतिनिधी

वास्को: आज 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास वास्कोत घडलेल्या विचित्र अपघाताने वास्कोवासीयांचे मन विषिण्ण झाले. प्रत्यक्षदर्शीनुसार सदर कदंबा शटल मडगांवहून आपल्या मार्गाने खारेवाडा येथील स्टॉप वर जात असता, रस्त्याच्या डाव्याबाजूने ट्रीपलसीट येणाऱ्या स्कूटरने चौकात कदंबा शटलला मागून धडक दिली व स्कूटर थेट मागील चाकांखाली गेली. या भीषण अपघातात प्रकाश बिंद (३०) जो स्कूटर चालवत होता , अरुणकुमार सरोज (२१) पिलियन स्वार यांस रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर तिसरा स्कूटरस्वार रितिश कुमार सरोज (29) हा गंभीर जखमी झाला आहे. सदर तिघेही तरुण बिर्ला झुआरीनगर येथील रहिवासी आहेत.

राज्यातील अपघातांचे शुक्लकाष्ट काही केल्या संपेना. दर दिवशी गोव्यात भीषण अपघात घडतायत. आणि त्यास कारणीभूत ठरतोय तो मुख्यत्वे वाहनचालकांचा बेजवाबदारपणा. कानात वारे गेले की वळू जसा सुसाट बेभान होऊन पळत सुटतो, तसेच हे चालक डोक्यात वारे गेले की कुणाचीही तमा न बाळगता गाड्या मिळेल तशा हाकतात. मग अशाच एका आडवळणावर मृत्यूचा वळू त्यांची वाट पाहतच उभा असतो. याच बेजवाबदार वाहनचालकांमुळे अनेक संसार आज उघड्यावर पडलेले आपणास दिसून येते.

कदंब शटलच्या चालकानुसार या तिघांच्या मागे पोलिस होते आणि कदाचित त्यांचा पिच्छा सोडवण्याच्या नादात गाडी घसरून हा अपघात घडला असावा.सदर घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाईकरिता पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!