मोरजी सरपंचपदी मुकेश गडेकर यांची बिनविरोध निवड

अलिखित करारानुसार सरपंच सुरेखा अमित शेट गावकर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे (प्रतिनीधी ) | मोरजी सरपंचपदी मुकेश गडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मागच्या पंधरा दिवसापूर्वी अलिखित करारानुसार सरपंच सुरेखा अमित शेट गावकर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदाची खुर्ची खाली होती. यासाठी खास पंचायत मंडळाची बैठक 14 रोजी पंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीत सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी मुकेश गडेकर यांचा एकमेव सरपंच पदासाठी अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच सुरेखा अमित शेटगावकर, पंच रजनी शिरोडकर, पंच सुप्रिया पोके, पंच मंदार पोके, पंच विलास मोरजे,पंच फटु शेटगावकर, उपसरपंच पवन मोर जे आदी उपस्थित होते.
पंचायत मंडळामध्ये अलिखित करार झाल्यानुसार एका एका वर्षासाठी सरपंचपद वाटून घेण्यात आली. सुरुवातीला सुरेखा अमित शेटगावकर यांची नियुक्ती झाली. त्यानंतर आता मुकेश गडेकर यांना सरपंच पदाची संधी देण्यात आली. मुकेश गडेकर यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सरकारच्या माध्यमातून आपण पंचायत क्षेत्राचा सर्व प्रभागाचा समान विकास करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. आपल्यावर जो विश्वास दाखवलेला आहे. त्या विश्वासाला आपण पात्र ठरणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित सरपंच मुकेश गडेकर यांनी व्यक्त केला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!