मॉन्सून अपडेट : बिपरजॉय येत्या काही तासांत रौद्ररूप धारण करेल ! ‘या’ राज्यात 14-15 जूनपर्यन्त अतिवृष्टीची शक्यता

अरबी समुद्रातून निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत आहे. पुढील चार दिवस केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरातसह अन्य काही राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

वेबडेस्क 10 जून : बिपरजॉयचा चक्रवात रौद्ररूप धारण करण्याच्या तयारीत असून, 10 जून रोजी सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग 35-45 किमी प्रतितास ते 55 किमी प्रतितास राहील असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तर उद्याच्या दिवशी, 11 जून रोजी 40-50 किमी प्रतितास वेगाने 60 किमी प्रतितास वेगाने ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढे १२ जून रोजी वाऱ्याचा वेग ४५-५५ किमी प्रतितास ते ६५ किमी प्रतितास राहील. पुढील दोन दिवस 13 आणि 14 जून रोजी 50-60 किमी प्रतितास वेगाने 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.

हवामान खात्याने म्हटले आहे की 10 जून रोजी समुद्राची स्थिती उग्र अशीच राहणार असून, 11 ते 14 जून दरम्यान  ओवर ऑल हवामान अत्यंत क्रिटिकल राहणार आहे तर याचा अर्थ केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरातसह अन्य काही राज्यांमध्ये अतिवृष्टी होईल असा सूचक इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.

चक्रवाताचे सध्याचे पोझिशनिंग

पुढील २४ तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी सांगितले की, ‘अत्यंत तीव्र’ चक्रीवादळ बिपरजॉय पुढील 24 तासांत आणखी तीव्र होऊन उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची अपेक्षा आहे. “पूर्व-मध्य अरबी समुद्रात अत्यंत तीव्र चक्रीवादळ BIPARJOY. पुढील 24 तासांत उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे,” IMD ने ट्विटमध्ये म्हटले आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील वलसाडमधील तिथल समुद्रकिनाऱ्यावर उंच लाटा उसळल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून तिथल बीच १४ जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे

वलसाडचे तहसीलदार टीसी पटेल म्हणाले, “आम्ही मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये, असे सांगितले आणि ते सर्व परतले आहेत. गरज पडल्यास लोकांना समुद्रकिनारी असलेल्या गावातून दूर हलवले जाईल. त्यांच्यासाठी निवारा तयार करण्यात आला आहे.”

तत्पूर्वी, चक्रीवादळ बिपराजॉय पुढील 36 तासांत तीव्र होण्याचा अंदाज असल्याने, हवामान खात्याने मच्छीमारांना केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीवरील समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे.

गोव्यासाठी 10 जूनचा दर तासाचा हवामान अंदाज

 ConditionsComfortPrecipitation
Time TempWeatherFeels LikeWind HumidityChanceAmount
13:00
Sat, 10 Jun
32 °CThundershowers. Cloudy.42 °C26 km/h70%68%0.7 mm (rain)
14:0032 °CA few tstorms. Overcast.41 °C27 km/h70%73%0.7 mm (rain)
15:0032 °CA few tstorms. Overcast.41 °C26 km/h72%75%0.7 mm (rain)
16:0031 °CA few tstorms. Cloudy.39 °C25 km/h74%75%0.6 mm (rain)
17:0030 °CA few tstorms. Cloudy.38 °C25 km/h77%73%0.6 mm (rain)
18:0030 °CIsolated tstorms. Overcast.38 °C24 km/h77%68%0.5 mm (rain)
19:0030 °CIsolated tstorms. Overcast.38 °C23 km/h78%61%0.4 mm (rain)
20:0030 °CIsolated tstorms. Overcast.37 °C23 km/h79%55%0.3 mm (rain)
21:0030 °CA few tstorms. Overcast.37 °C21 km/h81%52%0.6 mm (rain)
22:0029 °CA few tstorms. Overcast.36 °C20 km/h83%52%1.0 mm (rain)
23:0029 °CThunderstorms. Overcast.35 °C19 km/h84%53%1.4 mm (rain)
* Updated Saturday, 10 June 2023 06:18:01 Panaji time – Weather by CustomWeather, © 2023
हडगज

गोव्यासाठी पुढील 2 आठवड्यांचा अंदाज

SunMonTueWedThuFriSat
4567891032 / 29 °C
1131 / 28 °C1231 / 29 °C1332 / 29 °C1432 / 29 °C1532 / 28 °C1632 / 28 °C1732 / 28 °C
1832 / 28 °C1932 / 29 °C2032 / 29 °C2132 / 29 °C2232 / 28 °C2332 / 29 °C2431 / 28 °C
Goa weather in July 2023 | Goa 14 day weather
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!