मुसाफिरी | गोव्यात पर्यटनास येताय ? मग या गोष्टींचे पालन जरूर करा, अन्यथा…

ऋषभ | प्रतिनिधी

तुम्ही गोव्याचा दौरा करत असाल तर त्यासाठी पर्यटन विभागाने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे आधी वाचा. पर्यटन विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करताना कोणी पर्यटक किंवा व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. खरं तर, गोवा पर्यटन विभागाने जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि राज्यात येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

वारसा स्थळांना हानी पोहोचवू नका
- पर्यटकांनी गोव्यातील वारसा स्थळांची हानी करू नये. वारसा स्थळांचे लेखन, स्क्रॅचिंग किंवा कोणत्याही स्वरूपात नुकसान करू नका. येत्या पिढ्यांसाठी वारसा स्थळांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असावी, असे मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे.

2) कोणत्याही पर्यटकाने पर्यटन क्षेत्रात भीक मागण्यासाठी प्रोत्साहन देऊ नये किंवा स्वत: भीक मागू नये.

3) खुल्या भागात स्वयंपाक करणे आणि कोणत्याही पर्यटन क्षेत्रात कचरा टाकण्यास मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना दंड आकारला जाईल.
4) कोणत्याही पर्यटकाने त्याच्या परवानगीशिवाय इतर पर्यटक किंवा व्यक्तीसोबत सेल्फी घेऊ नये. पर्यटकांच्या गोपनीयतेचा आदर करा.

5) गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये कारण असे केल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

6) मोकळ्या ठिकाणी दारू पिणे हा येथे दंडनीय गुन्हा आहे. ते कायदेशीररित्या प्रतिबंधित आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट यांसारख्या कायदेशीर परवाना असलेल्या जागेत पर्यटक मद्यपान करू शकतात.

7) गोव्यात एखादा पर्यटक अंमली पदार्थांचे सेवन करताना पकडला गेला तर त्याला शिक्षा होऊ शकते.
8) पुढच्या वेळी गोव्याला जाणार असाल तर इथे वाहन भाड्याने घेताना काळजी घ्या. पर्यटक खाजगी बाईक आणि कॅब घेताना लक्षात ठेवा की तिच्याकडे वैध परमिट आहे. तुम्ही जी बाईक किंवा कॅब भाड्याने घेत आहात ती कायदेशीररीत्या पर्यटन विभागात नोंदणीकृत असावी.

9) नव्या मार्गदर्शक तत्त्वात पर्यटकांना केवळ पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत हॉटेल्स बुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

10 ) गोव्यात दारू पिऊन गाडी चालवू नका, तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
