मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सरल पगार योजनेचा शुभारंभ

Goan Varta Live | प्रतिनिधी
२६ एप्रिल २०२३: गोवा सरकारने रिफायनसोबत आज पंणजी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्यमंत्री सरल पगार योजना सुरू केली. रिफायन अॅप हे आर्थिक आरोग्याचे लोकशाहीकरण करण्यासाठी आणि व्यक्तींना आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने सक्षम करण्यासाठी एक नवीन पाऊल आहे.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वित्त खाते आणि लेखा संचालनालय विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी अथक परिश्रम घेत आहेत असे सांगितले. “कधीकधी काही कर्मचार्यांवर आर्थिक भार पडतो आणि ते सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतात, त्यांच्या गरजा भागविण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरतात. परंतु रिफायन अॅपद्वारे कोणतेही व्याज न देता आगाऊ पगार काढता येतो. मानव संसाधन सहकारी कर्मचार्यांनी हे अॅप वापरले आणि त्याचा खूप फायदा झाला. गोवा सरकारने ही योजना लागू केली आहे असे ते म्हणाले. त्यांनी वित्त आणि लेखा खात्यांतील अधिका-यांना या योजनेबद्दल इतरांना शिक्षित करून ते सुरळीतपणे राबविण्याची विनंती केली. लोकार्पण सोहळ्याला लेखा संचालक श्री दिलीप हुमरसकर उपस्थित होते.
सदर अॅप कोणत्याही त्रासाशिवाय डाउनलोड केले जाऊ शकते आणि नोंदणी प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण केली जाऊ शकते. या अॅपचे व्यवहार शुल्क नाममात्र आहे. कर्मचारी १० तारखेपासून चालू महिन्याच्या अखेरीस अॅपवरून पैसे काढू शकतात.
प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत व्यवहाराचा अहवाल संबंधित डीडीओला प्राप्त होईल आणि यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ज्या कर्मचाऱ्यांना पैशांची गरज भासते त्यांच्यावरील आर्थिक भार दूर होईल.