मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘रक्षक’ – ‘द सेव्हियर’ मोहिमेचे उद्घाटन…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : जागतिक ‘हृदय दिन’ २०२२ च्या निमित्ताने मणिपाल हॉस्पिटल्स, गोवा यांनी वैद्यकीय आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी तसेच गोव्यातील रहिवाशांना आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्यास, सक्षम बनविण्याच्या उद्देशाने बेसिक लाईफ सपोर्ट क्रिया शिकविण्यासाठी ‘रक्षक’ – ‘द सेव्हियर’ ही नवीन मोहीम सुरू केली आहे.
हेही वाचाःPhoto Story | Navratri Special Day – 5 | हिरवा रंग निसर्गासह पौष्टिक गुण आणि प्रजननक्षमता दर्शवतो…
जीव वाचविण्याच्या सेवा व कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देणे हे रक्षक चे उद्दिष्ट
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘रक्षक’ च्या पहिल्या सत्राचे उद्घाटन केले. यात गोवा पोलीस दल, वाहतूक विभाग (आरटीओ), कदंब वाहतूक महामंडळ लिमिटेड (केटीसीएल), गोवा मानव संसाधन विकास महामंडळ (जीएचआरडीसी) आणि गोवा अग्निशमन व आपत्कालीन सेवेतील १२५ पुरुष आणि महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. विविध सार्वजनिक क्षेत्रातील (केंद्र आणि राज्य सरकारी विभाग) आणि खासगी समुदायातील लोकांना मूलभूत जीवन समर्थन किंवा बी.एल.एस. सारख्या जीव वाचविण्याच्या सेवा व कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देणे हे रक्षक चे उद्दिष्ट आहे.
हेही वाचाःland Grabbing | जमीन हडप प्रकरणी मामलेदारासह दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी…
वैद्यकीयदृष्ट्या प्रशिक्षित करण्याची गरज वाढली
या नवीन उपक्रमासंदर्भात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले, “आपल्या राज्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात व गोवा पर्यटकांसाठी ओळखले जाते. अलीकडच्या काळात, आम्ही रस्ता अपघातांमध्ये वाढ पाहिली असून दर महिन्याला सरासरी २०० अपघात होतात. गोव्यातील लोकांना अशा आपत्कालीन परिस्थितींत प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी, वैद्यकीयदृष्ट्या प्रशिक्षित करण्याची गरज वाढली आहे, हि आमच्यासाठी स्पष्ट झालेली बाब आहे. शेकडो जीव वाचवू शकणारा हा उपक्रम सुरू केल्याने, मणिपाल हॉस्पिटल्सप्रति मला आनंद आहे.”
हेही वाचाःSharad Pawar | शरद पवार गोवा दौऱ्यावर!
प्रथम प्रतिसादकर्ते म्हणून कार्य करण्यास वळविणे हे मोहिमेचे उद्दिष्ट
मणिपाल हॉस्पिटल्स गोवा चे संचालक सुरेंद्र प्रसाद म्हणाले, “आपल्या राज्यातील रहिवाशांपर्यंत रक्षक किंवा आपत्कालीन परिस्थितीत तारणहारच्या रूपात, जीव वाचविण्याचे प्रशिक्षण पोचविणाऱ्या या महत्वाच्या मोहिमेचे उदघाटन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्याचा आम्हाला आनंद आहे. आपत्कालीन परिस्थितीचा विचार केला असता, एखाद्या घटनेनंतर – प्रथम प्रतिसादकर्ते घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीची वेळ जीव वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे, नागरिकांना मुलभूत जीवन सहाय्य क्रियांचे प्रशिक्षण देऊन, प्रथम प्रतिसादकर्ते म्हणून कार्य करण्यास वळविणे हे या रक्षक मोहिमेचे उद्दिष्ट आहे.”
हेही वाचाःसंशयास्पद व्यक्ती आढळल्यास ११२ क्रमांकावर कॉल करावा…
मणिपाल हॉस्पिटल्स गोवाचे एचओडी – विक्री आणि विपणन विभागाचे हरी प्रसाद यांनी देखील रक्षक उपक्रमाबद्दल आपले विचार सहभागी आणि प्रतिनिधींसोबत शेअर केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, दिपक एस. देसाई, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय, रुडोल्फो फर्नांडिस, आमदार सांताक्रूझ, नितीन रायकर अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालक, सुरेंद्र प्रसाद संचालक मणिपाल हॉस्पिटल्स गोवा, डॉ. आदित्य गोसावी वैद्यकीय अधीक्षक, मणिपाल हॉस्पिटल्स गोवा, डॉ. शेखर साळकर ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख, मणिपाल हॉस्पिटल्स गोवा आणि डॉ. जीधू, मणिपाल हॉस्पिटल्स गोवा आणि मणिपाल येथील आपत्कालीन आणि ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ. हॉस्पिटल्स मंगळूर
हेही वाचाःIndia Porn Ban : केंद्र सरकारकडून ‘या’ 67 पॉर्न बेवसाईट्सवर कारवाई…
गोव्यातील मणिपाल हॉस्पिटलच्या ‘रक्षक – द सेव्हियर’ मोहीमेचे उद्दिष्ट वैद्यकीय आपत्कालीन स्थितीच्या वाढत्या संख्येकडे लक्ष देणे तसेच गोव्यातील रहिवाशांना बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजेच मूलभूत जीवन समर्थन (बी.एल.एस.) क्रिया व सेवांबद्दल शिक्षित करून आपत्कालीन व गरजेच्या परिस्थितीत उपाय करण्यात सक्षम बनविणे आहे.
हेही वाचाःPFI | पीएफआयच्या चार सदस्यांना वाळपई पोलिसांनी घेतले ताब्यात…