मिनिस्टर ब्लॉकचे झाले ‘मंत्रालय’

Goan Varta Live | प्रतिनिधी
प्रतिनिधी | ज्ञानेश्वर वरक
पणजी : पर्वरी येथील पूर्वीच्या मिनिस्टर ब्लॉकचे आता मंत्रालय म्हणून नामकरण करण्यात आले आहे. गोवा राज्य घटक दिवसा निमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत याच्या हस्ते नवीन मुख्यमंत्री कार्यालयाचे उद्धघाटन करण्यात आले. धार्मिक विधी नंतर रीबन कापुन नव्या मंत्रालचे उद्धाटन करण्यात आले. या वेळी मंत्री आणि भाजप आमदारांनी उपस्थिती लावली होती. इमारतीच्या तीसऱ्या मजल्यावर आता एकमेव मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असणार आहे. एकूण 10.26 कोटी रूपये खर्चून या कार्यलयाचे बांधकाम जीएसआयडीसी मार्फत खाजगी कंत्राटदारांने पूर्ण केले आहे.

पुढील 50 वर्षाच्या विचार करून मंत्रालय कार्यालयाची बांधणी केली असल्याचे मुखमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी या वेळी सांगितले आहे. गोव्यातील जनतेची सेवा करत असताना मंत्र्यांना आणि अधिकऱ्यांना चागल्या पंद्धतीच्या सेवा मिळवून देण्याच्या हेतून या कार्यालयाची बांधणी केली आहे. कार्यालयात येणाऱ्या लोकांना देखील तेवढ्याच चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कार्यालयाची बांधणी करताना संस्कृती आणि गोव्याचा वारसा जपणारी शिल्प तयार करण्यात आली आहेत. या वेळी कंत्राटदाराचे मुख्यमंत्रांनी कौतूक केले. आता पुढील काळत मंत्रीमंडळ बैठक या नवीन मंत्रालयात होणार आहे. त्याच बरोबर सरकारी खात्यासंबंधीच्या बैठका आणि इतर महत्त्वाच्या बैठका याच कार्यलयात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. कार्यालयात येणाऱ्या सर्व लोकांना आता चांगल्या साधन सुविधा उपलब्ध झाल्या असल्याने मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तिसऱ्या मजल्यावर मुख्यमंत्राचे कार्यालय असणार आहे. एकूण 932 चौ.मि. क्षमतेचे मुख्यमंत्राचे कार्यालय आहे. मुख्यमंत्रांच्या सेक्रेटरी आणि ओएसडीसाठी वेगळे कार्यालय आहे. त्याच्या बाजूला पंधरा खुर्च्यांच्या क्षमतेचे मंत्रीमंडळ बैठकीसीठी कार्यालय आहे, या कार्यालयाला ‘मंथन’असे नाव देण्यात आले आहे. या कर्यालयात पंधरा खुर्चांच्या गोलकार टेबला सहित ओडीयो आणि व्हिडीओ कॉन्फरन्सींग सिस्टम आहे. साठ लोकांच्या क्षमतेचे गोव्याच्या सांस्कृतीचे दर्शन घडवणारा कॉन्फरन्स रूम आहे. या अभावी इलेक्ट्रिक पॅनल रूम, पॅंट्री, अशा साधन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

विरोधकांना देखिल दिले होते अमंत्रण
नवीन मंत्रालयाच्या उद्धाटन कार्यक्रमाचे सर्व सरकारमधील आमदारांसह विरोधी मिळून चाळीसही जणांना आमंत्रण देण्यात आले होते. हे मंत्रालय आमचे खाजगी नाही ते गोव्याच्या लोकप्रतिनिधीचे त्यामु आमंत्रण देऊनही विरोधक आले नाहीत तर त्याला आम्ही काही करूशत नाही. आम्ही आमदारांसह गोव्यातील इतर विरोधी पक्षांच्या पुढारांनाही आमंत्रण दिले होते पण कुणीही कार्यक्रमाला उपस्थित राहीले नाहीत, डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री
