माहिती खात्याच्या कर्मचार्‍यांचा निरोप

निवृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंत नसून ती आयुष्याच्या दुसऱ्या डावाची सुरुवात असते.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट : माहिती आणि प्रसिध्दी खात्याने त्यांचे कर्मचारी रेडिओ मेकॅनिक श्री सुधाकर फळदेसाई आणि मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) श्री अजित सावंत यांना निरोप दिला. श्री सुधाकर फळदेसाई यांनी सदर खात्यात ३४ तर श्री अजित सावंत यांनी ३१ वर्षे दीर्घ सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले आहेत.

श्री.सुधाकर फळदेसाई हे १२ डिसेंबर १९८८ रोजी सेवेत रुजू झाले होते आणि अजित सावंत १९९२ साली एडॉक म्हणून रुजू झाले आणि १२ जानेवारी १९९५ रोजी ते सेवेत नियमित झाले.

याप्रसंगी बोलतांना माहिती संचालक श्री. दिपक बांदेकर यांनी निवृतीचे आयुष्य आनंदाचे आणि निरोगी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. निवृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंत नसून ती आयुष्याच्या दुसऱ्या डावाची सुरुवात असते असे ते म्हणाले.

माहिती अधिकारी श्री प्रकाश नाईक यांनी दोन्ही कर्मचारी समर्पित आणि कष्टाळू कर्मचारी होते असे सांगून त्यांनी कामाचा अनुभव शेअर केला. माहिती अधिकारी श्री ऑल्विन परेरा यांनी सेवानिवृत्ती ही फक्त एक संख्या आहे आणि एका नवीन टप्प्याची सुरुवात आहे. आता ते आपला वेळ कुटुंबासाठी घालवू शकेल, अशी टिप्पणी त्यांनी केली.संयुक्त संचालक श्री पांडुरंग तळगावकर आणि श्री सिल्व्हेस्टर एस्टेबिरो यांनीही याप्रसंगी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी संयुक्त संचालक श्री पांडुरंग तळगावकर, ओएस श्रीमती मनीषा नाईक, , सहायक माहिती अधिकारी श्री शांतो नाईक, श्री निखिल प्राजक्ते आदी उपस्थित होते. तर, सहाय्यक माहिती अधिकारी श्री श्याम गावकर यांनी सूत्रसंचालन केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!