महिलेचा अश्लिल फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल

ऋषभ | प्रतिनिधी
पणजी, 1 मे : एका महिलेचा अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी कोलवाळ येथून एका 25 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाचा लग्नाचा प्रस्ताव महिलेने फेटाळला होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव विपिन चौरसिया असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.

पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी माध्यमांस संबोधित करताना सांगितले की, पीडितेच्या आईने तक्रार दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीने एक महिन्यापूर्वी तिच्या मुलीचा फोटो मोबाईलवर घेतला होता आणि नंतर तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तक्रारीत म्हटले आहे की, तरुणाने तक्रारदाराच्या कुटुंबातील सदस्य आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या संपर्काचा सोशल मीडिया ग्रुप तयार केला आणि तिच्या मुलीचा अश्लील फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेची बदनामी केली आणि तिचा छळ केला. रविवारी त्याच्याविरुद्ध कलम ३५४-ए, आयपीसीच्या ५०० आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.