भारतीय प्रवासी दिन सोहळ्यासाठी भारत सरकार तर्फे गुणाजी मांद्रेकर यांना निमंत्रण

भारतीय प्रवासी दिवस पहिल्यांदा 2003 मध्ये साजरा करण्यात आला होता तेव्हापासून तो दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो यंदा भारतीय प्रवासी दिवस 8 ते 10 जानेवारी दरम्यान इंदौर, मध्यप्रदेश येथे होणार आहे.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

इंदौर, मध्यप्रदेश येथे परराष्ट्र मंत्रालयातर्फे यंदा होणारा 18 वा भारतीय प्रवासी दिवस कार्यक्रमात भारतातील विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या 50 युवकांना भारतीय प्रवासी दिन सोहळ्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले असून गोव्यातील राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक गुणाजी मांद्रेकर यांना खास युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार तर्फे विशेष निमंत्रण करण्यात आला आहे.

गोव्याचे गुणाजी मांद्रेकर यांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने (2018-19) सन्मानित केले गेले.

या कार्यक्रमात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय युवा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांसह अनेक केंद्रीय मंत्री व अनेक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व 50 हुन अधिक देशांचे प्रतिनिधी व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा केला जाणार आहे.

केंद्रीय युवा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह गुणाजी मांद्रेकर

भारताच्या विकासात योगदान दिलेल्या परदेशात राहाणाऱ्या भारतीयांचा सन्मान करणे हा या दिवसामागचा प्रमुख उद्देश असतो. अनिवासी भारतीयांसाठी हा दिवस खास आहे कारण देशाबाहेर राहूनही ते भारताच्या विकासात भर घालतात, देशाचे नाव मोठे करत असतात. या दिवसाचे आयोजन भारत सरकारकडूनही केले जाते.या दिवसांचे महत्व काय आहे?खरंतर 9 जानेवारीला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले, म्हणूनच 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. गांधी भारतात परत येणे आपल्या देशासाठी एक महत्वाची घटना ठरली.

त्यानंतरच गांधीनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले आणि भारतीयांना3 पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी लढा दिला म्हणूनच भारतीय प्रवासी दिवस दरवर्षी 9 जानेवारीला साजरा केला जातो.हा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून परदेशात राहाणाऱ्या भारतीयांच्या मनात भारताबद्दलचे विचार आणि भावना व्यक्त होण्यासोबतच त्यांचा देशवासीयांशी सकारात्मक संवाद व्हावा. त्यांच्या कार्याचा गौरव केला जावा. हा दिवस साजरा करण्याचा आणखी एक उद्देश असाही असावा की, देशातील तरुण पिढीला परदेशात काम करत असलेल्या भारतीयांशी सुसंवाद होत राहील त्यांचे योगदान तरुणांपर्यंत पोहचेल.

परदेशात राहाणाऱ्या भारतीयांच्या मनात भारताबद्दलचे विचार आणि भावना व्यक्त होण्यासोबतच त्यांच्या कार्याचा गौरव केला जावा, असाही आणखी एक उद्देश हा दिवस साजरा करण्याचा होता.

प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची संकल्पना दिवंगत लक्ष्मीमल सिंघवी यांनी मांडली होती.यंदा साजरा होणाऱ्या प्रवासी दिनाचे औचित्य साधून अनिवासी भारतीयांचे व देशातील युवकांचे संबंध दृढ होण्यासाठी विचारांचे आदानप्रदान होण्याच्या उद्देशाने देशातील विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या 50 युवकांना केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय युवक कल्याण व खेळ मंत्रालय व मध्यप्रदेश सरकारच्या वतीने विशेष निमंत्रण देण्यात आले असून यामध्ये गोव्यातून गुणाजी मांद्रेकर यांचा समावेश असणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!