भाजप सरकारने मैनापी धबधबा पीडितांच्या कुटुंबांना त्वरित भरपाई द्यावी-गोवा टीएमसी

पर्यटकांना चांगले मार्गदर्शन आणि मदत देण्यासाठी अधिक अनुभवी स्थानिक वन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती यावेळी गोवा टीएमसीतर्फे करण्यात आली.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रीपोर्ट 13 जुलै : गोवा तृणमूल काँग्रेसने आज,ज्यांनी मैनापी धबधबा, नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य येथे, ९ जुलै २०२३ रोजी प्राण गमावले, त्या दिवंगत शिवदत्त संतोष नाईक आणि जनार्दन सडेकर यांच्या कुटुंबीयांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. गोवा तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि नेत्रावळी ग्रामपंचायतचे पंच राखी प्रभुदेसाई नाईक, आयटी समन्वयक तनोज अडवलपालकर आणि अल्पसंख्याक विभागाचे सह-समन्वयक व्हिन्सेंट फर्नांडिस यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत या दुःखद घटनेशी संबंधित अनेक समस्यांवर प्रकाश टाकला आणि पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

After Two Tourists Drown At Mainapi, Goa Bans Entry Of Visitors To  Waterfalls, Wildlife Sanctuaries

मैनापी धबधब्यावर आवश्यक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला जबाबदार धरून नाईक म्हणाल्या , ‘वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:च्या निष्काळजीपणा या दुःखद घटनेला कारण असल्याचे मान्य केले आहे.’ पुढे त्या म्हणाल्या , ‘गोवा टीएमसी न्याय आणि जबाबदारी मिळविण्याच्या आपल्या वचनबद्धतेत कायम आहे. गोवा टीएमसी घटनेच्या अहवालाच्या प्रकाशनाची आणि निष्कर्षांची आतुरतेने वाट पाहत आहे आणि न्याय मिळेल याची खात्री असण्याचे वचन देते.’

गलथान कारभाराबद्दल वनविभागाची टीका करताना त्या पुढे म्हणाल्या की, ‘धबधबा स्थळावरील सुरक्षा उपाय अपुरे आहेत, अपुरे जीवरक्षक आहेत, धोकादायक क्षेत्र दर्शविणाऱ्या फलकांचा अभाव आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस किंवा महिला पोलिसांची कमतरता त्यांनी निदर्शनास आणून दिले, त्या म्हणाल्या , ‘५०० हून अधिक लोकांची गर्दी असूनही, त्या ठिकाणी फक्त एकच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. वनविभागाची जबाबदारी वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्‍या पर्यटकांकडून प्रति व्यक्ती १०० रु. इतके प्रवेश शुल्क वसूल करण्यापलीकडे आहे. पर्यटकांची सुरक्षा आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असली पाहिजे.’’

Mainapi Waterfall: One of the Best Waterfalls in Goa | Digha Beach

याला जोडून नाईक म्हणाल्या , ‘मैनापी धबधब्यावर सहाय्यक वनसंरक्षक दामोदर सालेलकर हे असून त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात ते अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी त्यांच्या भूमिकेची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास त्यांची बदली करावी.’

पक्षाच्या मागणीचा पुनरुच्चार करताना नाईक म्हणाले, ‘पर्यटकांना चांगले मार्गदर्शन आणि मदत देण्यासाठी आम्ही अधिक अनुभवी स्थानिक वन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती करते . अश्या भविष्यातील घटना टाळण्यासाठी, पर्यटकांना धोकादायक भागात प्रवेश करण्यावर कठोर बंदी घालणे आवश्यक आहे, ज्यात स्पष्टपणे सीमांकित प्रतिबंधित झोन आणि धोक्याचे चिन्हे आणि सर्व अभ्यागतांना ‘लाइफ जॅकेट’ प्रदान करणे आवश्यक आहे, जेणेकरुन बुडण्याचे अपघात कमी होतील आणि एकूणच सर्व सुरक्षा वाढेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!