बेरोजगारी दराने गाठला उच्चांक: रोजगाराच्या आघाडीवर वाईट बातमी, खेड्यांपेक्षा शहरी भागात बेरोजगारी जास्त, पहा संपूर्ण तपशील
CMIE डेटानुसार, डिसेंबर 2022 मध्ये सर्वाधिक बेरोजगारीचा दर हरियाणा राज्यात होता (37.4 टक्के), सर्वात कमी बेरोजगारीचा दर ओडिशा राज्यात होता (0.9 टक्के).

ऋषभ | प्रतिनिधी
भारताचा बेरोजगारी दर: देशातील रोजगाराच्या आघाडीवर एक नवीन अहवाल समोर आलाय . सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने रविवारी देशातील बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली. डिसेंबर 2022 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 8.30 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या 16 महिन्यांतील हा उच्चांक आहे. यामध्ये खेड्यांपेक्षा शहरी भागात परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. CMIE च्या आकडेवारीनुसार, हरियाणा राज्यात सर्वाधिक बेरोजगारीचा दर 37.4 टक्के आहे, तर ओडिशा राज्यात सर्वात कमी बेरोजगारीचा दर 0.9 म्हणजेच 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

शहरी आणि गावांची स्थिती पहा
आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये शहरांमधील बेरोजगारीचा दर 10.09 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो मागील महिन्यात 8.96 टक्के होता. त्याचवेळी ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर ७.५५ टक्क्यांवरून ७.४४ टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये बेरोजगारीचा दर ८.०० टक्के होता. बघा काय झाली राज्यांची अवस्था….

बेरोजगारीचा दर काय होता ते जाणून घ्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, CMIE चे मॅनेजिंग डायरेक्टर महेश व्यास म्हणतात की बेरोजगारीच्या दरात झालेली वाढ दिसते तितकी वाईट नाही. ते म्हणाले की, याआधी कामगारांच्या सहभागाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये ते 40.48 टक्क्यांपर्यंत वाढले, जो 12 महिन्यांतील उच्चांक आहे.