“बस्ती फ्री बांदोडा” करण्यासाठी आर.जी. कडून स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

दिनांक ०६ जुन: रोजी रेव्होलुशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी आपल्या मडकई मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान बांदोडा पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर पणे उभारण्यात आलेली शापुर बस्तीची पाहणी केली होती. तिथे मिलिटरी कॅम्प जवळच ही बस्ती कशी व कोणाच्या आशीर्वादाने उभी केली गेली याचाही पर्दाफाश परब यांनी केला होता. आता परत एकदा रेव्होलुशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर दबाव आणून बस्ती हटवण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात श्री कटमगाळ दादा यांचा आशीर्वाद घेवून केली आहे.

यादरम्यान पत्रकाराशी बोलताना आर.जी. चे प्रेमानंद गावडे यांनी बेकायदेशीर पणे उभरण्यात आलेली ही बस्ती तेथील जनतेसाठी धोकादायक असून, ते एक मिनी तालिबान असून, त्यामध्ये कोणकोणत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहतात हे सांगता येत नाही. आज जर लोकांनी ह्या बस्ति विरोधात आवाज उठविला नाही तर यापुढे ह्याच बस्तीतील पंच निवडून येईल, आणि तेच उद्या स्थानिक गोवेकरावर अन्याय अत्याचार करतील. तेव्हा प्रत्येक बांदोडा वासियाने ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून ही बस्ती फ्री बांदोडा ह्या मोहिमेला आपली स्वाक्षरी देऊन सहमती दर्शवावी असे प्रेमानंद गावडे यांनी म्हटले.

आर.जी. चे दिनेश गावडे यांनी सुद्धा जनतेला आव्हाहन करताना म्हटले आहे की, जर आज आम्ही एकजुटीने ह्या बेकायदेशीर गोष्टीवर आवाज उठविला नाही, त्यांना धडा शिकविले नाही तर भविष्यात आम्हाला ह्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आज स्थानिक आमदार सुदिन ढवळीकर फक्त परप्रांतीयांना आपल्या राजकीय स्वार्थ साधण्यासाठी, त्यांच्या मतासाठी, त्यांना सर्व सुविधा पुरवित असतात. त्याच्याच आशीर्वादाने आज ही एवढी मोठी बस्ती झालेली आहे. आज जर आम्ही गप्प बसून राहिले तर, ढवळीकर फक्त बांदोडाच नाही तर पूर्ण मडकई मतदारसंघ, आणि मडकईकरांचे अस्तित्वच नष्ट करणार असल्याचे दिनेश गावडे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!