फाळणी स्मृतिदिनी पणजीत मूक मोर्चा…

विभाजन झाल्याने या दिवसाला अधिक महत्त्व

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : देशात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ म्हणजे फाळणी दिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.
हेही वाचा:’हे’ आहेत राष्ट्रपती पदकप्राप्त झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी…

घोषणा न देता शांततापूर्ण काढण्यात आला मूक मोर्चा

फाळणी दिनानिमित्त संध्याकाळी पणजी चर्च ते आझाद मैदान येथे स्मृती दिनानिमित्त मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कुठलीच घोषणा न देता शांततापूर्ण हा मूक मोर्चा काढण्यात आला. यादिवशी विभाजन झाल्याने या दिवसाला अधिक महत्त्व आहे. त्याची आठवण म्हणून स्मृती दिवस साजरा करण्यात आला.
हेही वाचा:संजीवनी साखर कारखान्याजवळ अपघात : एक ठार…

पणजी बसस्थानकावर प्रदर्शन

पणजी बसस्थानक येथे स्मृती दिनानिमित्त प्रदर्शन भरविण्यात आले असून याचे उद्घाटन अभिलेखागार आणि पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी गृह सचिव मेनिनो डिसोझा, संजीव गडकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांचीही उपस्थिती होती. नागरिकांसाठी विशेष प्रदर्शन सरकारतर्फे पणजी आणि म्हापसा येथील बसस्थानकावर भरविण्यात आले आहे. 
हेही वाचा:Shocking | Crime | पाच महिन्यांच्या चिमुकलीचा जन्मदात्यांनीच घेतला बळी, लाटण्याने…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!