प्रुडंट अहेड, गोव्यातील बातम्यांना आता राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व

फोमेंतो मिडीयाच्या गोव्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आस्थापनांचा यशाचा आलेख वाढत आहे.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: गोव्याच्या बातम्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व मिळणार आहे. इंडिया अहेड या चॅनलने गोव्याचे न्युज चॅनल प्रुडंट मिडियाशी कंटेंट करार केला आहे. शुक्रवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या खास उपस्थितीत करार स्वाक्षरी कार्यक्रम संपन्न झाला.


इंडिया अहेड ही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी सर्व राज्यांना तसेच मेट्रो शहरांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व देत आहे. गोव्यासाठी राज्यातले अग्रगण्य चॅनेल प्रुडंट मीडियाची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून गोवा राज्याची संस्कृती, परंपरा, अर्थकारण, औद्योगिक प्रगती, सामाजिक वाटचाल, तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. साधारण वर्षभर या खास शो चे प्रसारण होणार आहे.

यासंदर्भातल्या करारावर आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, इंडिया अहेडचे एडिटर इन चीफ भुपेंद्र चौबे, मॅनेजिंग डायरेक्टर गौतम मुथा, प्रुडंट मीडियाचे एडिटर इन चीफ प्रमोद आचार्य, फिल्ममेकर अर्जुन पांडे, फोमेंतो मिडीयाचे संचालक ज्यो लुईस यांची प्रमुख उपस्थिती होती. संबंधित करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर मान्यवरांनी या नव्या वाटचालीला आपल्या मनोगतात शुभेच्छा दिल्या.

फोमेंतो मिडीयाचा वाढता आलेख

फोमेंतो मिडीयाच्या गोव्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आस्थापनांचा यशाचा आलेख वाढत आहे. गोव्यात प्रुडंट मिडीया न्युज चॅनल तशेच मराठी दैनीक गोवन वार्ता, इंग्रजी दैनीक द गोवन आणि कोंकणी दैनीक भांगरभुंय लोकांना दर्जात्मक बातम्या देत आहेत. तर महाराष्ट्रात सिंधुदुर्ग लाईव्ह लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर फोमेंतो मिडीया गोव्यात गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमातून मराठी न्युज चॅनलचा शुभारंभ करणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!