प्रसिद्ध गोमंतकीय चित्रपट संकलक वामन भोसले यांचे निधन

गोव्यातील पोंबुर्फा या छोट्याशा गावात जन्मलेले वामन भोसले प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: प्रसिद्ध गोमंतकीय चित्रपट संपादक वामन भोसले यांचे निधन झाले. सोमवार, 26 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1969 मध्ये त्यांनी राज खोसला यांच्या ‘दो रास्ता’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. ‘मेरा गाव मेरा देश’, ‘इंतेकाम’, ‘इंकार’, ‘मौसम’, ‘आंधी’, ‘दोस्ती’, ‘कर्ज’, ‘हिरो’, ‘सौदागर’ आणि ‘गुलाम’ इत्यादी हिंदी चित्रपट आणि अशाने अनेक सुपरहिट सीरियल त्यांनी संपादित केल्या आहेत. 2002 मध्ये त्यांनी कामातून निवृत्ती घेतली

वृद्धापकाळाने त्यांनी आज (सोमवारी) सकाळी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. ‘इन्कार’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

वामन भोसलेंची ओळख

हिंदी चित्रपटसृष्टीत नामवंत संकलक म्हणून वामन भोसले यांचा दबदबा दीर्घकाळ राहिला. गोव्यातील पोंबुर्फा या छोट्याशा गावात जन्म झालेले वामन भोसले प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. येथे एडिटर डी.एन. पै यांच्या मार्गदर्शनात त्यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये एडिटिंगचे धडे गिरवले होते. त्यानंतर फिल्मिस्चान स्टुडिओमध्ये त्यांनी 12 वर्षे सहायक संपादक म्हणून काम केले होते. काही महिन्यांच्या कामानंतर ‘फिल्मिस्तान’कडे सहायक संकलक म्हणून ते काम करू लागेल. 1967 मध्ये राज खोसला यांनी त्यांच्याकडे राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या भूमिका असलेल्या ‘दो रास्ते’या चित्रपटाची स्वतंत्रपणे जबाबदारी सोपवली. 1978मध्ये ‘इन्कार’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘गुलाम’च्या त्या दृश्यामुळे झाले कौतुक


आमीर खान अभिनेती ‘गुलाम’ चित्रपटात एक दृश्य आहे. समोरून रेल्वे येत असताना समोरील मार्कपर्यंत धावत पोहोचण्याची पैज लागते. नायक आव्हान स्वीकारतो आणि समोरून रेल्वे येत असताना तिच्या दिशेने धावत सुटतो… आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच खुणेच्या पलीकडे रेल्वेसमोरून बाजूला झोकून देतो. हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर रेल्वेशी संबंधित जे स्टंट सीन्स आहेत, त्यामध्ये हा सर्वोत्कृष्ट सीन मानला जातो. या दृश्याचे संकलक होते वामन भोसले. राज्य सरकारने 2019 ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला होता.

1978 मध्ये मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार

राज एन. सिप्पी दिग्दर्शित आणि विनोद खन्ना-विद्या सिन्हा स्टारर ‘इनकार’ या चित्रपटासाठी वामन भोसले यांना 1978 मध्ये बेस्ट एडिटिंगचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिलीप कुमार, राजकुमार, मनीषा कोईराला आणि विवेक मुशरान स्टारर आणि सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ या चित्रपटासाठी वामन यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

1967 मध्ये मिळाला होता पहिला मोठा प्रोजेक्ट

1967 मध्ये राज खोसला यांनी दिग्दर्शित केलेला ‘दो रास्ते’ हा एडिटर म्हणून वामन यांचा पहिला मोठा प्रोजेक्ट होता, या चित्रपटासाठी त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. नंतर त्यांनी खोसला यांच्या व्यतिरिक्त गुलजार, सुभाष घई, शेखर कपूर, रवी टंडन, महेश भट्ट, राज सिप्पी, अनिल गांगुली, सुनील दत्त, विक्रम भट्ट आणि के विश्वनाथ अशा अनेक दिग्दर्शकांसोबत काम केले. त्यांनी एडिट केलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये ‘मेरा गांव मेरा देश’, ‘दो रास्ते’, ‘इनकार’, ‘दोस्ताना’, ‘गुलाम’, ‘अग्निपथ’, ‘हीरो’, ‘कालीचरण’, ‘राम लखन’ आणि ‘सौदागर’ यांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!