पुढील उन्हाळ्यात सत्तरीत धो धो नळाला पाणी ? पर्येत 15 एमएलडी ‘रॉ वॉटर’ पंपिंग स्टेशनला मंजूरी: आमदार डॉ. देविया राणे

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 01 जुलै : तब्बल 24 कोटी खर्च असलेला केरी, पर्ये, मोर्ले, पिसुर्ले, होंडा आणि भिरोंडा पंचायतीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी, मोर्ले पुनर्वसन कॉलनी येथे WTP साठी 15 MLD ‘रॉ वॉटर’ पंपिंग स्टेशन बांधण्याच्या प्रकल्पाला मंजूरी जलसंसाधन खात्यातर्फे नुकतीच देण्यात आली . सदर प्रकल्प मंजूर झाल्याची माहिती पर्ये मंतदारसंघांच्या आमदार देविया राणे यांनी आपल्या फेसबूक हॅंडलवर पोस्ट करुन सार्वजनिक केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आणि विशेषत: जलसंधारणमंत्री सुभाष शिरोडकर, ज्यांनी पर्येच्या लोकांच्या वतीने डॉ. राणे यांनी केलेली विनंती मान्य व्हावी यासाठी वैयक्तिक रस घेतला, यांचे डॉ. देविया राणेंनी आभार मानलेत . त्या पुढे म्हणाल्या “लोकांसाठी वचनबद्ध असल्याने, मला विश्वास आहे की 24 कोटींचा हा प्रकल्प पाणीपुरवठा सुधारण्यास मदत करेल आणि आपल्या लोकांना मोठा दिलासा देईल.” सदर प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल.