‘… पण लोक आपले आरोग्य सांभाळण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही ही खंत’ – मुख्यमंत्री सावंत

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 17 ऑगस्ट | सर्व इस्पीतळातील ओपरेशन थिएटर येणाऱ्या काळात कार्यान्वीत करण्याचा सरकारचा विचार असून डिचोली, साखळी व सत्तरीतील ओटी सुरू करण्यासाठी खासगी डॉक्टरांची साथ आरोग्य खाते घेणार आहे. लोकांना मोफत आरोग्य चिकित्सा सेवा या ओटीतून मिळणार.

त्याचप्रमाणे साखळीत आयुष इस्पितळाची व गोमेकॉची सेटलाईट ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. सरकार लोकांच्या आरोग्यासाठी खुप काही करत आहे, मात्र लोक आपले आरोग्य सांभाळण्यासाठी काहीच प्रयत्न करीत नाही ही खंत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

गोमेकॉ नंतर राज्यात पहिल्याच नेत्रचिकीत्सा ओपरेशन थिएटरचे उदघाटन साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांची स्थिती अधिक सुधारताना या इस्पितळांमध्ये आवश्यक त्या सर्व.आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे

यासाठीची फाईल मुख्यमंत्री डॉ. सावंत लवकरच मंजूर करणार असून त्यानंतर लोकांना आरोग्य सेवेसाठी बाहेरगावी जावे लागणार नाही. टाटा इस्पितळाशी करार करून गोव्यात आला कँसरसारख्या रोगावर मोफत उपचार मिळणार. त्यासाठी आरोग्य खात्याची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी गेली आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले.
