नवे वाहतूक नियम उल्लंघनाचे आर्थिक दंड, युवक काँग्रेस आक्रमक
अर्जुन धस्के | प्रतिनिधी

सरकारनं नवीन वाहतूक उल्लंघन दंडांची अंमलबजावणी करू नये असा इशारा युवा काँग्रेसने दिलाय. कोविडमुळे सामान्य लोकांच आर्थिक गणित कोलमडलंय. त्यात आता या नव्या दंडांच्या तरतूदींची भर नको. गोवा हे एक पर्यटन राज्य आहे. आणि सध्या पर्यटनामधून गोव्याला काही प्रमाणात पैसा यतोय. जर नवे दंड लागू केले तर त्यांचा दुरुपयोग करुन पर्यटकांना नाहक मनस्ताप देण्याच्या प्रकारात वाढ होण्याची भीती युवक काँग्रेस पदाधिकार्यांनी व्यक्त केलीय. अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकरांच्या नेतृत्वाखाली युवा काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी वाहतूक संचालक राजन सातार्डेकरांना निवेदन सादर केलं.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.