देवळाच्या घंटेखाली उभा राहीला,आणि कोट्यवधींचा चूना लावून गेला ! ‘या’ ठकसेनांचे कारनामे ऐकाल तर थक्क व्हाल

समीर धावस्कर आणि दिनकर सावंत जोडगोळीचा पराक्रम

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः राष्ट्रीय आणि खाजगी बँकापेक्षा अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून आत्तापर्यंत हजारो गोंयकारांना गंडा घालण्याचे प्रकार झालेत. हीच गत सरकारी नोकऱ्यांबाबत होतेय. सरकारी नोकरी किंवा सरकारी नोकरीतील बढती मिळवून देण्यासाठी कितीही आणि कुठूनही पैसे आणून ते देण्याची तयारी गोंयकारांची असते. समीर धावस्कर आणि दिनकर सावंत या जोडगोळीने हेच हेरले. देवळाच्या घंटेखाली उभे राहून किंवा भर मंदिरात देवाला प्रमाण होऊन सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करून या दोघाही ठकांनी आत्तापर्यंत सुमारे 4 ते 5 कोटी रूपयांचा गंडा लोकांना घातल्याचा संशय आहे. मुकेश नाईक नामक एका युवकाने केलेल्या तक्रारीवरून या दोघांचे बिंग फुटले आणि आता एकापेक्षा एक सरस कथा उघड होऊ लागल्या आहेत.

Marketing, Security Teams Must Ally To Purge Copycat Websites

मृदु वाणी, अचाट धाडस

समीर धावस्कर हा सवर्ण- डिचोली येथील युवक. गोवा फुटबॉल विकास महामंडळात नोकरीला होता. तिथे बनावट सॅलेरी सर्टिफिकेट तयार करून केरी अर्बन बँकेचे 3 लाखांचे कर्ज काढून त्या बँकेला गंडवल्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंद झाला. तिथून त्याला कामावरून कमी केले. पण पट्ट्याने हीच संधी साधली आणि स्वयंप्रेरित व्यवसाय सुरू केला. तिथून एका बड्या खाण कंपनीच्या कार्यालयात प्यून म्हणून रूजू झाला आणि ह्या कंपनीत आपण एका बड्या हुद्दावर असल्याच्या तोऱ्यात लोकांकडे डील करू लागला. आपण आयएएस अधिकाऱ्याचा ड्रायव्हर आहे,असे म्हणून त्याने नोकऱ्या मिळवून देण्याचा वेगळा मार्ग शोधला.

सरकारी अधिकार्यांच्या सह्यांचे बनावट आदेश, बनावट निवड यादी, बनावट सरकारी सर्कुलर आणि ऑर्डर्स अशी बरीच तयारी त्याने करून लोकांच्या मनांत अजिबात संशय येणार नाही,अशीच आपली मोडल ऑपरंडी वापरली. हे करत असताना एका बड्या तारांकित हॉटेलसाठी वाहने भाड्यावर लावण्यासाठीही लोकांकडून पैसे घेतले. बघता बघता या प्रकरणांची व्याप्ती ५ कोटी रूपयांपेक्षा अधिक झाल्याचे उघडकीस येत आहे. तो ठकसेन असल्याची वार्ता सर्वंत्र पसरल्यानंतर आता ठिकठिकाणाहून लोक पोलिस स्थानकांत धाव घेऊन आपल्याकडील त्याच्या व्यवहारांचीही माहिती उघड करीत आहेत.

How a simple IDOR become a $4K User Impersonation vulnerability | by  Shahmeer Amir | Shahmeer Amir

पोलिसांचे योग्य सहकार्य

तिस्क- उसगांव येथील मुकेश नाईक या युवकाने पहिली तक्रार करण्याचे धाडस केले. पणजी पोलिस स्थानकाचे निरिक्षक आणि उपअधिक्षक यांनी त्यांना योग्य सहकार्य केल्यामुळेच त्यांनी हे धाडस केले. तिथे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी जाळे टाकून या दोघांनाही ताब्यात घेतले. तिथून एकापाठोपाठ एक प्रकरणे उघडकीस येऊ लागली. डिचोली पोलिस स्थानकांतही त्याच्याविरोधात तक्रार नोंद झाली आहे. तिथेही डिचोलीचे पोलिस निरीक्षक आणि पोलिस अधिक्षक यांनी तक्रारदारांना सहकार्याची भूमिका घेतल्यामुळेच आता लोक तक्रार करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत.

Visakhapatnam: Forgery racket busted, 13 held for impersonation |  Visakhapatnam News - Times of India

लाईनमन बनला फसवा पीए

वीज खात्यात लाईनमन म्हणून सेवेत असलेला आणि कुठल्यातरी एका प्रकरणात निलंबित असलेला दिनकर सावंत हा समीर धावस्करचा या खोट्या धंद्यातील पार्टनर. दिनकर सावंत हा आयएएस अधिकाऱ्याचा पीए असं म्हणून समीर धावस्कर लोकांना सांगायचा. त्याच्याकडे फोनवरून लोकांना बोलायला द्यायचा. हे सगळं करत असताना अनेकदा आपल्या गिऱ्हाईकांना घेऊन समीर धावस्कर पर्वरी सचिवालयात यायचा. तिथे बिनधास्त सचिवालयातील सचिवांच्या कार्यालयात जाऊन बसायचा आणि आपली पक्की ओळख आहे,असे भासवायचा.

Three women held for hiring proxy candidate to sit in 2018 DSSSB exam;  impersonator still at large- The New Indian Express

कित्येकदा आल्तीनो येथील सचिवांच्या बंगल्यावरही तो लोकांना घेऊन आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. समीर धावस्कर याची कार्यपद्धती पाहील्यास त्याने टीव्ही सिरिअल किंवा फिल्ममधील अशा प्रकरणांचा चोख अभ्यास करून स्वतःला पक्का तयार केल्याचेही तक्रारदार सांगतात. शेवटी जेव्हा लोकांना आपण फसलो गेलोत याची जाणीव झाली तेव्हा त्यांनी या दोघांचेही व्हाईस रिकॉर्डिंग आणि व्हिडिओ शुट करून त्यांना उघड पाडले आणि नंतरच पोलिस स्थानकांत धाव घेतली. आपले बिंग फुटल्याची जाणीव होताच दोघेही फरार झाले होते परंतु पोलिसांनी अत्यंत शिताफिने त्यांना ताब्यात घेतले आहे.

सिंधुदुर्गात समीरचा वावर


गोव्याशेजारील सिंधुदुर्ग तालुक्यात समीर धावस्करचा मोठा वावर होता. तो हे पैसे नेमके कुठेतरी गुंतवत होता अशी शक्यता आहे. समीरच्या कुटुंबियांची भेट तक्रारदारांनी घेतली असता त्यांच्याकडून अत्यंत वाईट वागणुक मिळाल्याचे तक्रारदारांनी सांगितले. गोव्यासहित सिंधुदुर्ग तालुक्यातीलही अनेकांना या दोघांनी गुंडवले जाण्याची शक्यता असून आता या प्रकारानंतर सगळ्याच प्रकरणांचा पोलखोल होईल,अशी शक्यता वर्तविण्यात येते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!