दिल्ली पोलिस ट्रेनिंग सेंटरला भेट देत आयजीपी ओमवीर सिंह यांनी प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला

प्रशिक्षणार्थी पोलिस कॉन्स्टेबलांची भेट घेत दिल्ली पोलिसांशीही चर्चा केली.

Goan Varta Live | प्रतिनिधी

नव्याने गोवा पोलिस खात्यात भरती झालेल्या पोलिस कॉन्स्टेबल्सना दिल्लीत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आलं असता तिथल्या अस्वच्छ वातावरणामुळे काहींची तब्येत बिघडली होती. दिल्लीतील पोलिस ट्रेनिंगची अस्वच्छ स्थिती दर्शवणारे काही फोटोही प्रसिद्ध झाले होते. या सर्व प्रकारानंतर गोव्याचे आयजीपी ओमवीर सिंह स्वतः स्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले आहेत. त्यांनी प्रशिक्षणार्थी पोलिस कॉन्स्टेबलांची भेट घेत दिल्ली पोलिसांशीही चर्चा केली.

आता सदर दिल्ली पोलिस ट्रेनिंग सेंटरचे फोटो गोव्याचे डीआयजी जसपाल सिंग यांनी आपल्या सोशल मिडीयावर प्रसिद्ध केले आहेत. गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना डीआयची जसपाल सिंग यांनी सांगितलं की, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर हवामानातील बदलामुळे तब्येत बिघडू शकते. अस्वच्छतेचे जे काही फोटो प्रसिद्ध झाले होते ते सिलेक्टिव्ह होते. मी स्वतः दिल्ली पोलिस ट्रेनिंगचा ताबा हाताळला आहे. तिथे एकाचवेळी 10-10 हजार पोलिस प्रशिक्षण घेतात. त्यामुळे मी अधिकाराने सांगू शकतो की तेथे तशी अस्वच्छ परिस्थिती नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!