थकबाकी वेळेत वसूल केली जाईल : ढवळीकर

राज्यातील विजेच्या समस्येवर सोमवारी विधानसभेत तपशीलवार चर्चा झाली ज्यात विजेशी निगडीत विविध मुद्दे उपस्थतीत केले गेले.

Goan Varta Live | प्रतिनिधी

वेबडेस्क 8 ऑगस्ट : औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून सरकार 400 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी वेळेत वसूल केले जातील, असे आश्वासन राज्याचे वीजमंत्री ‘सुदिन’ ढवळीकर यांनी सोमवारी राज्य विधानसभेत दिले.

“देय 400 कोटींहून अधिक आहे आणि निश्चितपणे आम्ही वेळेत वसूल करू,’ असे त्यांनी वीज विभागाच्या अनुदानाच्या मागणीवरील चर्चेदरम्यान उत्तर देताना सांगितले.

मात्र, यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या या कायद्यामुळे सरकारला खासगी वीज कंपनीला ५१० कोटी रुपये द्यावे लागले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Goan Varta: जूनपासून ग्राहकांना प्रत्येक महिन्याला वीजबिल : ढवळीकर

एरियल बंच्ड केबलिंग प्रकल्पाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासनही मंत्री सुदिन यांनी सभागृहाला दिले.

पथदिव्यांच्या प्रश्नावर ढवळीकर म्हणाले की, पथदिव्यांच्या संदर्भात विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांसोबत बैठका घेणार असून येत्या दोन महिन्यांत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी विविध विभागांकडून पथदिवे लावले जात असले तरी त्यांची देखभाल योग्य प्रकारे होत नसल्याकडे लक्ष वेधले.

Goa news| गोव्यातील पथदीव्यांची समस्या लवकरच सोडवणार: सुदिन ढवळीकर

स्मार्ट मीटर प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच काम सुरू होईल, अशी माहिती मंत्र्यांनी सभागृहात दिली.

सोलर व्हिलेज शक्य आहे की नाही याबाबत वित्त विभागाशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा मुद्दा आमदार व्हेंझी व्हिएगास यांनी केला होूता .

वीज मंत्र्यांनी सांगितले की, वीज विभागातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे पुरविण्यात आली असून, त्यांनी कोणत्याही कामावर हजर असताना त्याचा वापर करावा.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शॉकमुळे आतापर्यंत 65 लोकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आणून दिले आणि सरकारला योग्य ती खबरदारी घेऊन यावर उपाय योजना करण्याचा सल्लाही दिला.

मध्यंतरी मुख्यमंत्री प्रमोदसावंत म्हणाले की, सेफ्टी ऑडिट केले जात आहे. किरकोळ चुकांमुळे या घटना घडत असल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी निर्देशनास आणून दिले.

राज्यातील कोणत्याही सरकारच्या इतिहासात प्रथमच विद्युत विभागाने राज्यभरात 2 हजार 863 कोटी रुपयांची कामे केली असल्याची माहिती ढवळीकर यांनी सरतेशेवटी सभागृहात दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!