तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आर.जीचे मनोज परब यांनी घेतली भेट

भेटीदरम्यान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या सरकारने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Goan Varta Live | प्रतिनिधी

राज्यभरात रेव्होलुशनरी गोवन्स चे प्रमुख मनोज परब यांचे दौरे सुरू असून, इतरही राज्यातील प्रादेशिक पक्ष प्रमुखांशी भेटी गाठीचे दौरे सुरूच आहे. दोन दिवसापूर्वीच परब यांनी तेलंगाणा मधील मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची त्यांच्या निवास स्थानात भेट घेतली. जवळ जवळ दोन तास परब आणि आर.जी. च्या क्रांतिकाऱ्यानी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी बातचीत केली असता विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

Telangana devises ways to reduce irrigation water usage for paddy - Elets  eGov

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या सरकारने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विशेषतः कृषी क्रांती बद्दल भरपूर माहिती यावेळी देण्यात आली. तेलंगाना सरकारच्या क्रांतिकारी धोरणामुळेच तेथील शेतकरी आज यशस्वीपणे शेती करत आहे. तिथले कृषी धोरण हे तिथल्या शेतकऱ्यासाठी वरदान ठरले असून, त्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ झालेली आहे.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कमलेश्र्वरंम इथे असलेल्या जगातील सर्वात मोठ्या प्रवाही सिंचन प्रकल्पाची माहितीसुद्धा यावेळी दिली. तेलंगाना सरकारकडून तरुण पिढीला नवीन नवीन रोजगार संधी, त्याचबरोबर बिझनेस स्टार्टअप साठी सुद्धा विशेष आधार देण्यात येत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

World's largest multi-stage lift irrigation project ready for launch in  Telangana

या भेटीविषयी बोलताना मनोज परब यांनी आपण तेलंगाना मुख्यमंत्र्यांशी गोवा आणि गोव्याच्या अपयशी ठरलेल्या प्रशासन व सरकारची धोरणाबद्दलही बातचीत झाली, त्याचबरोबर आपले राज्याचे अस्तित्व, तिथली संस्कृती कशा पद्धतीने वाचवता येईल. कोणती धोरणे योग्य ठरतील अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. आर.जी.पी. परत एकदा तेलंगाना राज्यात प्रवाही सिंचनाचा अभास करण्यासाठी जाणार असून यापुढेही प्रादेशिक पक्ष प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी असे दौरे इतर राज्यातही सुरूच राहणार असल्याचे मनोज परब म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!