जूनमध्ये लांबलेला पाऊस जुलैमध्ये महागाई वाढवतोय; टोमॅटोचे दर भिडतायत गगनाला

Goan Varta Live | प्रतिनिधी

वेबडेस्क 5 जुलै : यंदा एल निनोच्या तडाख्यामुळे मॉन्सून लांबला, त्यामुळे एकंदरीत फळ भाज्यांच्या पीकावरसुद्धा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे जेवढ्या काहीप्रमाणात गोव्यात भाज्या आणि फळे येतायत त्यांची किंमत चढलेलीच आहे. परिणामस्वरूप सामान्य जनतेच्या खिशावर महागाईचा बोजा पडताना दिसतोय.

The Goan EveryDay: 400 fined at crowded Bicholim weekly market

सरकारी आकडेवारीत महागाईचा दर खाली आला आहे. पण सर्वसामान्य ग्राहकांना विचाराल तर कळेल की महागाई त्यांच्या खिशाला आणि बचत किती लुटत आहे. अशा परिस्थितीत, महागाईचा सामना करण्यासाठी, भारतीय कुटुंबांनी जीवनावश्यक वस्तूंच्या मोठ्या पॅकेटऐवजी लहान पॅकेज आणि पाऊच खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. बाजारातील लोकांच्या खर्चाच्या पद्धती आणि सवयींमध्ये बदल होताना दिसत आहे. 

भारतीय कुटुंबे महागाईचा कसा सामना करत आहेत, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे टोमॅटो. किरकोळ बाजारात टोमॅटो 90 रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक टोमॅटो खरेदी करण्याऐवजी टोमॅटो प्युरीची छोटी पाकिटे खरेदी करू लागले आहेत. 200 ग्रॅम टोमॅटो प्युरीचा पॅक फक्त 25 रुपयांना उपलब्ध आहे. आले 400 रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे आले विकत घेण्याऐवजी त्याच्या पेस्टचे छोटे पॅक विकत घेत आहोत जेणेकरून बचत करता येईल. जिऱ्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत असून, दर 550 रुपयांवरून 800 रुपये किलोवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जिरे पावडरच्या छोट्या पाकिटांपासून सुरुवात करून ते खुल्या बाजारातून कमी प्रमाणात जिरेपूड विकत घेत आहेत.

 

In Emerald Town - All About Belgaum

फळे आणि भाज्या यांचे आजचे बाजारभाव


क्र
भाजी घाऊक किंमतकिरकोळ किंमतशॉपिंग मॉल
1 कांदा मोठा₹२३₹२६ – २९₹२८ – ३८1 किलो
2 कांदा लहान₹५३₹६१ – ६७₹६४ – ८७1 किलो
3 टोमॅटो₹८५₹९८ – १०८₹१०२ – १४०1 किलो
4 हिरवी मिरची₹५८₹६७ – ७४₹७० – ९६1 किलो
5 बीटरूट₹४६₹५३ – ५८₹५५ – ७६1 किलो
6 बटाटा₹२९₹३३ – ३७₹३५ – ४८1 किलो
7 कच्ची केळी (केळी)₹९₹१० – ११₹११ – १५1 किलो
8 राजगिरा पाने₹१२₹१४ – १५₹१४ – २०1 किलो
9 आवळा₹८०₹९२ – १०२₹९६ – १३२1 किलो
10 राखी₹१८₹२१ – २३₹२२ – ३०1 किलो
11 बेबी कॉर्न₹६७₹७७ – ८५₹८० – १११1 किलो
12 केळीचे फूल₹१७₹२० – २२₹२० – २८1 किलो
13 शिमला मिर्ची₹४६₹५३ – ५८₹५५ – ७६1 किलो
14 कारले₹३१₹३६ – ३९₹३७ – ५१1 किलो
15 दुधीभोपळा₹२८₹३२ – ३६₹३४ – ४६1 किलो
16 बटर बीन्स₹५०₹५८ – ६४₹६० – ८३1 किलो
17 ब्रॉड बीन्स₹४६₹५३ – ५८₹५५ – ७६1 किलो
18 कोबी₹१७₹२० – २२₹२० – २८1 किलो
19 गाजर₹४९₹५६ – ६२₹५९ – ८१1 किलो
20 फुलकोबी₹२६₹३० – ३३₹३१ – ४३1 किलो
21 क्लस्टर बीन्स₹४४₹५१ – ५६₹५३ – ७३1 किलो
22 नारळ₹३४₹३९ – ४३₹४१ – ५६1 किलो
23 कोलोकेशिया पाने₹१३₹१५ – १७₹१६ – २१1 किलो
24 कोलोकेशिया₹२७₹३१ – ३४₹३२ – ४५1 किलो
25 कोथिंबीरीची पाने₹१०₹१२ – १३₹१२ – १७1 किलो
26 कॉर्न₹२६₹३० – ३३₹३१ – ४३1 किलो
27 काकडी₹२६₹३० – ३३₹३१ – ४३1 किलो
28 कढीपत्ता₹२६₹३० – ३३₹३१ – ४३1 किलो
29 बडीशेप पाने₹१२₹१४ – १५₹१४ – २०1 किलो
30 ड्रमस्टिक्स₹१००₹११५ – १२७₹१२० – १६५1 किलो
31 वांगे₹२४₹२८ – ३०₹२९ – ४०1 किलो
32 वांगी (मोठी)₹२६₹३० – ३३₹३१ – ४३1 किलो
33 सुरण ₹२७₹३१ – ३४₹३२ – ४५1 किलो
34 मेथीची पाने₹१२₹१४ – १५₹१४ – २०1 किलो
35 चवळीच्या शेंगा₹६६₹७६ – ८४₹७९ – १०९1 किलो
36 लसूण₹१२८₹१४७ – १६३₹१५४ – २११1 किलो
37 आले₹७७₹८९ – ९८₹९२ – १२७1 किलो
38 कांदा हिरवा₹४३₹४९ – ५५₹५२ – ७१1 किलो
39 मटार₹७७₹८९ – ९८₹९२ – १२७1 किलो
40 पडवळ ₹२७₹३१ – ३४₹३२ – ४५1 किलो
41 लिंबू (चुना)₹५१₹५९ – ६५₹६१ – ८४1 किलो
42 आंबा कच्चा₹३०₹३५ – ३८₹३६ – ५०1 किलो
43 पुदीना पाने₹६₹7 – 8₹7 – 101 किलो
44 मशरूम₹८५₹९८ – १०८₹१०२ – १४०1 किलो
45मोहरीची पाने₹१५₹१७ – १९₹१८ – २५1 किलो
46 लेडीज फिंगर₹४४₹५१ – ५६₹५३ – ७३1 किलो
47 भोपळा₹१६₹१८ – २०₹१९ – २६1 किलो
48 मुळा₹३४₹३९ – ४३₹४१ – ५६1 किलो
49 कडधान्य₹३४₹३९ – ४३₹४१ – ५६1 किलो
50 शालोट (मोती कांदा)₹३५₹४० – ४४₹४२ – ५८1 किलो
51 पडवळ (छोटी) ₹३४₹३९ – ४३₹४१ – ५६1 किलो
52 सॉरेल पाने₹११₹१३ – १४₹१३ – १८1 किलो
53 पालक₹१२₹१४ – १५₹१४ – २०1 किलो
54 रताळे₹३७₹४३ – ४७₹४४ – ६१1 किलो
Vegetable prices shoot up by 25-30%
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!