जी 20 अंतर्गत पर्यटन कार्यगटाच्या चौथ्या बैठकीचे आज गोवा येथे उद्घाटन सत्र संपन्न

पर्यटन मंत्रालयाने जी 20 अंतर्गत आयोजित केलेल्या पर्यटन कार्यगटाच्या चौथ्या बैठकीचे उद्घाटन सत्र आज सकाळी गोव्यात झाले.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी, गोवा 20 जून : जी 20 अंतर्गत पर्यटन कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री  जी. किशन रेड्डी, पर्यटन राज्यमंत्री  अजय भट्ट ; पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संबोधित केले . गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यावेळी उपस्थित होते.

उद्घाटन सत्राला संबोधित करताना केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास  मंत्री  जी.के.रेड्डी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 पर्यटन कार्यगटाच्या बैठका झाल्या. यामध्ये गुजरातमधील कच्छचे रण येथे पहिली बैठक, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे दुसरी बैठक  जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे तिसरी बैठक झाली. या बैठकांमध्ये जगभरातील तज्ञ, नवोन्मेषक आणि नेत्यांसोबत विविध  पर्यटन प्रकारांबाबत   अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक आणि सकारात्मक चर्चा झाली.

जानेवारी ते एप्रिल 2023 या कालावधीत भारतात आलेल्या परदेशी  पर्यटकांची संख्या 2022 मधील याच कालावधीतील संख्येपेक्षा  166% अधिक  आहे : जी. किशन रेड्डी

आमच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे सौंदर्य, महानता आणि समृद्धता तसेच  देशातील विविध ठिकाणांचे वैविध्य अनुभवले नसेल तर भारताची भेट अपूर्ण राहील, असेही ते म्हणाले. ते म्हणाले, “आमच्याकडे  50 हून अधिक शक्तीपीठे आहेत, जिथे महिलांच्या दैवी सामर्थ्याची  पूजा केली जाते. भारत हे शीख धर्माचे जन्मस्थान आहे आणि आमच्याकडे अमृतसर इथे शीख  सुवर्ण मंदिर आहे, जे बंधुत्व आणि समतेचे प्रतीक आहे.

“भारत हे बौद्ध आणि जैन धर्माचे जन्मस्थान आहे आणि जवळपास 80% हिंदू लोकसंख्या आहे असे ते म्हणाले. भारतातील 200 मोठे बौद्ध मठ आपल्याला अहिंसेच्या बौद्ध तत्त्वांची आणि निसर्गाबरोबर सुसंवाद राखत जगण्याच्या जैन तत्त्वज्ञानाची आठवण करून देतात , जो सरकारच्या मिशन LiFE – पर्यावरणपूरक  जीवनशैलीचा आधार आहे.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाविषयी बोलताना ते म्हणाले, “समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक सामर्थ्याला योग्य मान्यता मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार 2014 पासून पर्यटनाला चालना देत आहे आणि ते आमच्या देशाचे पर्यटन राजदूत आहेत, जे जागतिक स्तरावर भारतीय पर्यटनाची ओळख करून देत आहेत. “

“प्राचीन काळापासून, भारतातील प्रवास हा स्वतःचा शोध घेण्याची एक संधी होती आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांसाठी आणि स्वत:चा शोध घेण्यासाठी भारत हे नेहमीच लोकप्रिय ठिकाण राहिले आहे. या निमित्ताने  200 देशांतील लोकांना आणि विविध धर्मांच्या लोकांना भारताची संस्कृती आणि आध्यात्मिक वारसा अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे”असे ते म्हणाले.

शाश्वत, सर्वसमावेशक आणि लवचिक पर्यटन क्षेत्राच्या निर्मितीसाठी गोवा आराखडा  हे प्रमुख मार्गदर्शक साधन असेल: श्रीपाद येसो नाईक

जी.के.रेड्डी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की भारतात, ‘अतिथी देवो भव’  या आमच्या प्राचीन तत्त्वज्ञानाच्या भावनेने जिथे पाहुण्याला देव  मानले जाते.   कोविड 19 नंतर  परदेशी पर्यटकांची संख्या पुन्हा वाढली  आहे आणि जानेवारी ते एप्रिल 2023  या कालावधीत भारताला भेट दिलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या 2022 मधील  याच कालावधीतील संख्येपेक्षा  166% जास्त आहे. भारताला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या  2023 मध्ये महामारीपूर्वीच्या पातळीपर्यंत येईल अशी शक्यता  आहे.

ते पुढे म्हणाले की, शाश्वत विकासाचे  उद्दिष्टे साध्य करण्यासाठी  अंतिम बैठक  आपल्याला केंद्र सरकार आणि इतर सरकारे तसेच  आणि  पर्यटन क्षेत्रातील भागधारकांसाठी कृती बिंदू आणि  शिफारसी देईल.

केंद्रीय मंत्री म्हणाले, “सध्या आपल्या भारत सरकारन  दोन गोष्‍टी करण्‍यासाठी  प्राधान्य दिले  आहे. यामध्‍ये  पर्यटकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी शाश्‍वत  पायाभूत सुविधा निर्माण करणे   त्याचबरोबर या सुविधा  जबाबदारीने वापरणे  आणि पर्यावरणाबाबत जागरूक बनून तशाप्रकारच्या जीवनशैलीचा स्वीकार केला जावा,  यासाठी  पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.  G20 पर्यटन आणि एडीजी डॅशबोर्ड तयार करून एक वारसा तयार केला असल्याचे मंत्री म्हणाले.

नव्याने विकसित होत असलेल्या  डॅशबोर्डमध्ये  अधिक शाश्‍वत , सर्वसमावेशक, तसेच  लवचिक पर्यटन क्षेत्रासाठी जी- 20 सदस्य देश आणि अतिथी देशांची  धोरणे आणि त्यांचे उपक्रम यांना प्रोत्साहन दिले जाईल.

यासाठी एकत्र येऊन आपल्या भावी पिढीसाठी अधिक वैविध्यपूर्ण, लवचिक आणि शाश्वत  पर्यटन क्षेत्र तयार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बोलताना श्रीपाद  नाईक  म्हणाले  की, गोवा हे सुट्टीचा काळ व्‍यतीत करण्‍यासाठी अतिशय  योग्य ठिकाण आहे. इथे पाहण्यासारख्या विविध गोष्टी आहेत. येथे प्रसन्न लँडस्केप, पामच्‍या वृक्षराजींच्‍या रांगेने नटलेले समुद्रकिनारे, सोनेरी वाळू, नेत्र सुखद- हिरवीगार गावे,  अद्भुत सांस्कृतिक इतिहासाचा अप्रतिम संगम इथे आहे आणि पूर्व आणि पश्चिम संस्कृतींचे अनोखे मिश्रण इथे पहायला मिळते.

सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने ग्रामीण पर्यटन स्थळांच्या विकासावर केंद्र सरकारचा भर :  अजय भट्ट

श्रीपाद  नाईक  असेही म्हणाले की, “किनारपट्टीच्या भागात चांगल्या प्रकारे विकसित पर्यटन पायाभूत सुविधा आहेत. इथले पाणी, सागरी किना-यावर  अनुकूल हवामान यामध्‍ये  देशातील साहसी पर्यटनाला इथे चालना मिळण्यास मदत होत आहे.   देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांमध्ये अशा साहसी सागरी पर्यटनाची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येत आहे.”

ते म्हणाले की, साहसी पर्यटनासाठी राष्ट्रीय धोरण तयार केले आहे. यामुळे भारत साहसी पर्यटन स्थळ म्हणून एक पसंतीचे स्थान मिळवू शकणार आहे. तसेच  देशात साहसी पर्यटन वाढण्यास मदत यामुळे मिळणार आहे. भारताची  रणनीती साहसी स्थळे विकसित करणे, साहसी पर्यटन, कौशल्य विकास, क्षमता वाढवणे आणि यासंबंधी जाहिरात करतानाच ,  सुरक्षिततेवर भर  देण्यावर लक्ष केंद्रित करण्‍यात येत आहे.

ते पुढे म्हणाले की पर्यटनासाठी गोवा आराखडा  जी – 20 पर्यटन कार्यगटाच्या गेल्या तीन वर्षांतील प्रयत्नांवर आधारित आहे आणि भारताच्या जी- 20 अध्यक्षपदाच्या  अंतर्गत हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास, पर्यटन एमएसएमई आणि डेस्टीनेशन  व्यवस्थापन या पाच परस्परांशी  जोडल्या गेलेल्या  प्राधान्य क्षेत्रांशी संबंधित आहे.  शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी 2030 चे उद्दिष्‍ट्य  साध्य करण्यासाठी संबंधित शिफारस केल्या आहेत.

मंत्री श्रीपाद नाईक  असेही म्हणाले की,  शाश्वत, सर्वसमावेशक आणि लवचिक पर्यटन क्षेत्राच्या निर्मितीसाठी गोवा पथदर्शी कार्यक्रम  म्हणजे  प्रमुख मार्गदर्शक साधन असेल.

गोवा हे सर्व ऋतूंमधील एक पर्यटन स्थळ आहे जिथे या किनारी  नंदनवनात  प्रत्येकासाठी आनंददायी गोष्टी  आहेत :  प्रमोद सावंत

यावेळी बोलताना पर्यटन राज्यमंत्री  अजय भट्ट म्हणाले की पर्यटनामुळे लोकांना इतर संस्कृतींबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते आणि समुदायांना सशक्त बनवते, पर्यटनामुळे अर्थव्यवस्था वाढण्यास मदत होते. शेवटच्या मैलापर्यंत  ‘कनेक्टिव्हिटी’ मध्ये वाढ करून गंतव्यस्थानावर मजबूत पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे देशातील पर्यटनाचा  अनुभव चांगला घेण्‍यासाठी  मदत झाली आहे.

याशिवाय, ज्याठिकाणी कमी लोक जातात, अशा पर्यटन स्थळांच्या प्रचारात समाज माध्‍यमांनीही मोठा हातभार लावला आहे.  कारण पर्यटनामध्‍ये थरारक अनुभव घेता येतात, आनंद आणि सांस्कृतिक देवाणघेवाण  होते, त्याचबरोबर  समृद्ध करणारे अनुभव मिळतात.

प्रसाद (PRASAD) योजने बद्दल बोलताना त्यांनी सांगितले, “भारत हे आध्यात्मिक पर्यटन आणि वारसा पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे, ही गोष्ट विशेष लक्षात घ्यायला हवी. तीर्थक्षेत्रे आणि वारसा स्थळांकडे पर्यटक आकर्षित व्हावेत, यासाठी, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, 2014-2015 मध्ये ‘प्रसाद’, अर्थात तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन योजना (PRASAD), सुरू केली होती.”

भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय ग्रामीण पर्यटन स्थळांच्या विकासावर भर देत असल्याचेही त्यांनी सांगितले. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जतन करणे आणि त्याचा प्रचार करणे तसेच पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत विकास सुनिश्चित करणे, हे त्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, जागतिक पर्यटन प्लास्टिक उपक्रमाने पर्यटन उद्योगाला समान उद्दिष्टासाठी  एकत्र आणले आहे, ज्यामध्ये प्लास्टिक प्रदूषण त्याच्या उगम स्थानावरच रोखले जाते.  यासाठी सरकारे, उद्योग व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारकांच्या एकत्रित आणि समर्पित प्रयत्नांची आवश्यकता आहे, ज्यायोगे पर्यटन उद्योगात शाश्वत पर्यटन पद्धतींना चालना मिळेल, असे ते म्हणाले. 

उद्घाटन सत्राला संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, विविध प्रदेशांमधील पर्यटकांना वर्षभर आकर्षित करणाऱ्या गोव्याचे महत्व अधोरेखित केले. प्रवासाच्या शाश्वत अनुभूतीला प्राधान्य देणार्‍या सर्वसमावेशक प्रवास क्षेत्राला चालना देण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. 

‘वसुधैव कुटुंबकम’, या संकल्पनेखाली आज गोव्यामध्ये एकत्र येऊन, आपण अधिक समावेशक शाश्वत आणि समृद्ध जगाच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे, असेही ते म्हणाले.  गोवा हे ‘पर्ल ऑफ द ओरिएंट’ म्हणून प्रसिद्ध असून, दरवर्षी देशातल्या आणि परदेशातल्या लाखो पर्यटकांना आकर्षित करत असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा हे इथले सुंदर समुद्र किनारे, चैतन्यमय  नाईटलाइफ, रोमहर्षक साहसी खेळ, जागतिक वारसा असलेला पश्चिम घाट आणि आकर्षित करणारे धबधबे, शांत बॅकवॉटर, योग आणि निरामयता , स्वादिष्ट खाद्य संस्कृती आणि अद्वितीय संस्कृती आणि वारसा, यासाठी देखील ओळखले जाते, असे ते म्हणाले. 

ते म्हणाले की, गोवा हे सर्व हंगांमांचे पर्यटन स्थळ असून, समुद्र किनाऱ्यावरील हे नंदनवन प्रत्येकाला भरभरून काहीतरी देते. गोव्याला भेट देणारे पर्यटक वेगवेगळ्या जल-क्रीडा आणि चैतन्यमय नाईट-लाईफचा आनंद घेतात, सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि स्थानिक खाद्य प्रकारांचा आस्वाद घेतात.   

क्रुझ पर्यटनासाठी भारत हे प्रमुख केंद्र करणे  या विषयावरील चर्चा सीआयआय  अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या संयुक्त विद्यमाने आज ‘आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात क्रुझ  पर्यटनाला प्रोत्साहन आणि विकास, नदी क्रुझ पर्यटनाचा विकास, क्रुझ  पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने यशस्वी पद्धती यावर चर्चा झाली.

भारतासाठी मसुदा धोरण – दृष्टीकोन  आणि एकात्मिक क्रुझ   पर्यटन धोरणाचे अनावरण जी. किशन रेड्डी,  श्रीपाद नाईक आणि अजय भट्ट यांनी मुख्य कार्यक्रमासोबतंच आयोजित केलेल्या दुसऱ्या कार्यक्रमात  केले.

भारत सरकार क्रुझ  पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यात उत्तमोत्तम सुधारणा करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे आणि सर्वंकष  क्षेत्राच्या दृष्टिकोनासह काम करत आहे, असे या विषयावरील चर्चेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री जी.के. रेड्डी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आगामी काळात कोणालाही क्रुझ  पर्यटनाचा अनुभव घेता यावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. क्रुझ  पर्यटनामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आम्ही विविध मंत्रालये, राज्य सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था, भागधारक आणि उद्योग यांच्याशी समन्वय साधत आहोत. आपल्याकडे 7500 किलोमीटरहून अधिक लांबीची किनारपट्टी आहे, जी क्रुझ  पर्यटनाद्वारे उपयोगात आणता येईल असेही रेड्डी म्हणाले.

गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांनी आपले विचार मांडताना म्हटलं की, गोव्यात प्रचंड क्षमता आणि मजबूत जहाज बांधणी आणि समुद्र पर्यटन उद्योग आहे. ‘मेक इन गोवा फॉर द ग्लोब’ या दृष्टिकोनातून गोवा क्रुझ  पर्यटनामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासात अग्रणी भूमिका निभावत आहे. क्रुझ  पर्यटन उद्योगाला बळकटी देण्यासाठी गुंतवणुकीला आमंत्रित करत असल्याचे ते म्हणाले. गोव्यातल्या सागरी उद्योगाला चालना देण्यासाठी अशा प्रकारचे पहिले सागरी क्लस्टर सुरू करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

क्रुझ  पर्यटनात भारताला अग्रेसर करणं या विषयावरील चर्चेदरम्यान पर्यटन राज्यमंत्री, श्री अजय भट्ट यांनी सांगितले की, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भागधारक आणि सरकारी उपक्रमांमधील सक्रिय सहभागाने, भारत स्वतःला लवकरच क्रुझ पर्यटनासाठी एक प्रसिद्ध जागतिक स्थळ म्हणून प्रस्थापित करेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!