जलसमाधी मिळालेले ‘ते’ मृतदेह अखेर सापडले; परिवारावर पसरली शोककळा

ऋषभ | प्रतिनिधी
तेरेखोल, केरी-पेडणे : रविवारी 24 एप्रिल 2023 रोजी तेरेखोल केरीच्या समुद्रकिनाऱ्यावर जे घडले ते अगदीच दुर्दैवी असे होते. एक परिवार समुद्रकिनाऱ्यावर येतो काय, आणि त्यांचेवर काळाचा घाला पडतो काय सगळेच काही सुन्न करणारे.

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार काल घडलेल्या आपघातातील चौघांपैकी दोघांचे मृतदेह काल सायंकाळी मिळाल्यानंतर,दोघांचे मृतदेह आज सोमवारी 24 एप्रिल 2023 रोजी मिळाले आहेत. तबस्सूम खातून(१४) आणि महमद अली (१८) यांचे मृतदेह पोलिस यंत्रणेच्या अथक शोधमोहिमेअंती हाती लागलेले आहेत .

सुट्टीचा रविवार ठरला घातवार ! एकाच परिवारातील चौघे बुडाले; केरी -पेडणे येथील काळजाचा ठाव घेणारी घटना
बुडालेल्या सदर चार व्यक्ती, केरी समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी घेण्याकरिता परिवारातील इतर सदस्यांच्या नजरा चुकवत धोकादायक अशा अपघातप्रवण क्षेत्र सी रॉक जवळ गेल्या. सेल्फी काढत असतानाच पाय घसरून दोघेजण लाटांसह वाहून गेले. त्यास वाचवण्यासाठी गेलेले अन्य दोघेही जोरदार लाटांच्या फेऱ्यात वाहून गेले. त्यातील दोघांचे मृतदेह काल सायंकाळी सापडले होते . तर उर्वरित दोन मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम राबवली गेली ज्यास आज सकाळी यश आले.
पर्यटकांनी किनाऱ्यावर यावे, फिरावे, मौजमज्जा जरूर करावी पण त्यासोबतच स्वतःची अन स्वतःच्या परिवाराची देखील काळजी घ्यावी. ज्या स्थळावर जाल त्या ठिकाणी असलेल्या अपघातप्रवण ठिकाणापासून 4 हात लांब रहावे. सतर्क रहा सुरक्षित रहा, गोवन वार्ता लाईव्हची सर्वांना कळकळीची विनंती.
