गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण; पंतप्रधान 3 जून रोजी दाखवणार हिरवा झेंडा

देशातील ही 19वी वंदे भारत रेल्वेगाडी असेल,या रेल्वेगाडीमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव आणि पर्यटनाला चालना मिळणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली,एजन्सी 2 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जून रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल. ही रेल्वेगाडी  देशातील 19वी वंदे भारत रेल्वे असेल.

Delhi Bhopal Vande Bharat Express train route PM Modi to flag off 11th  semi-high speed train Delhi Bhopal Vande Bharat Express train number  timings | Industry News, Times Now

ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वेगाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वेगाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासाची बचत होईल.

मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास वंदे भारत रेल्वे सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल; यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वेगाड्यांच्या तुलनेत प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासाची बचत

दिल्ली-जयपुर के बीच शुरू हुआ Vande Bharat Express ट्रेन, सिर्फ 1 घंटे 45  मिनट में पहुँचे, देखें किराया, रूट map और timing….

स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!