गोवा शालांत बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर; लागला 95.46 टक्के निकाल, वाचा सविस्तर

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट, पणजी : आज दिनांक 06 मे 2023 रोजी शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी गोवा शालांत बोर्डाचा 12वीचा निकाल, गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी जाहीर केला. सदर परीक्षेस एकूण 19366 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, यातले 18496 जण उत्तीर्ण झाले.

ठळक मुद्दे :
1. गोवा बोर्ड निकाल 2023: 95.46% परीक्षा उत्तीर्ण
2. एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी : 95.46%
3. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण: 95.03%
४ . मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण : 95.88%
ही टक्केवारी पहा :
कॅटेगरी / शाखा / श्रेणी | परीक्षा उत्तीर्ण झाले | निकाल |
रिपीटर | 180 | 61.86 % |
दिव्यांग | 138 | 97.87 % |
कला शाखा | 4701 | 95.16% |
वाणिज्य शाखा | 5772 | 96.52 % |
विज्ञान शाखा | 5044 | 96.19 % |
व्यावसायिक शाखा | 2980 | 92.75 % |
परीक्षेला बसलेल्या मुला-मुलींची टक्केवारी
शाखा | मुले | मुली | एकूण |
कला | १,७०० | ३३६४ | ५०६४ |
वाणिज्य | ३२९७ | २७८० | ६०७७ |
विज्ञान | २५३० | 2850 | ५३८० |
व्यावसायिक | 2403 | ८७८ | ३२८१ |
एकूण | ९९३० | ९८७२ | 19802 |
खाजगी उमेदवार | ४६ | ३४ | 80 |
NSQF उमेदवार | ६१५ | ६१४ | १२२९ |
ITI उमेदवार | ३४ | 10 | ४४ |
राज्यात सांगे तालुक्याचा निकाल सर्वाधिक 98.63 % लागला असून, सर्वाधिक कमी निकाल सत्तरीचा लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदादेखील मुलींनी निकालात बाजी मारली असून, परीक्षेला बसलेल्या 9716 मुलींपैकी 9316 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत व मुलींची ओव्हरऑल टक्केवारी 95.88 % अशी आहे. तर परीक्षेला बसलेल्या 9661 मुलांपैकी 9181 मुलगे उत्तीर्ण झालेत, आणि मुलांची ओव्हर ऑल टक्केवारी ही 95.03 % राहिली. ओव्हरऑल निकाल 95.46 टक्के राहिला.
गोवा बोर्ड HSSC निकाल आणि मार्कशीट कशी तपासायची?
1. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या gbshse.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2. मुख्यपृष्ठावर, “गोवा बोर्ड HSSC निकाल मार्च 2023 डाउनलोड करा” असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
3. तुमची क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
4. ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या