गोवा पोलिसांची ‘ग्रीन कॉरिडोर’ यशस्वी

Goan Varta Live | प्रतिनिधी
प्रतिनिधी | ज्ञानेश्वर वरक
पणजी : शनिवारी संध्याकाळी गोवा पोलिसांकडून अभिमानास्पद कामगिरी बजावण्यात आलीए. गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी ते दाबोळी विमांतळपर्यंतचा ही ग्रीन कॉरिडोर यशस्वी रित्या झाल्याची माहिती माहिती उत्तर गोवा पोलिस अधिक्षक निधीन वाल्सन यांनी ट्वीट करून दिली आहे. यकृत आणि हृदय प्रत्यारोपणासाठी हा ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. या कामगिरीत सोटो गोवा संस्थेच्या संचालक डॉ. प्रिती वर्गिस यांची मोलाची साथ मिळाली असल्याचे वाल्सन यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे. शनिवारी संध्याकाळी गोवा पोलिसांनी ही कामगीरी यशस्वी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव बांबोळीहून दाबोळी विमानतळावर येण्यात आलेत. यकृत आणि हृदय हे अवयव लवकर पोचवण्याची जबादारी गोवा पोलिसांवर होती. त्यामुळे रस्त्यावर कुठेही ट्राफिक जाम होऊ नये यासाठी पोलिसावर ही कामगिरी देण्यात आली होती. या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी कामगीरी यशस्वी पार पाडली आहे. ही कामगीरी पार पाडत असताना इतर वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामानये याचीही काळजी पोलिसांकडून घेण्यात आली होती.

ग्रीन कॉरिडोर म्हणजे नेमके काय..
“ग्रीन कॉरिडॉर” हा एक नियुक्त केलेला मार्ग आहे जो अवयव ज्या हॉस्पिटलमध्ये घेतला जातो आणि ज्या हॉस्पिटलमध्ये त्याचे प्रत्यारोपण केले जाईल त्या दरम्यानचा रस्ता वाहतुकीपासून दूर ठेवतो. मार्ग स्वहस्ते चालविला जातो. “ग्रीन कॉरिडॉर” ची कल्पना भारतात २०१४ पासून अस्तित्वात आहे. विविध प्रकारच्या वाहतुकीचा वापर करून एका इस्पितळातून दुसर्या रुग्णालयात अवयवांचे हस्तांतरण सुरक्षित आणि जलद केले जाते कारण “ग्रीन कॉरिडॉर” म्हणून ओळखल्या जाणार्या विशिष्ट मार्गामुळे अनेक विभाग आणि अधिकारी देखरेख करतात.

हे रुग्णवाहिकांना जाण्यासाठी एक विशिष्ट मार्ग चिन्हांकित करते जेणेकरुन त्या द्रुतगतीने ६०% पर्यंत जलद-जास्त वाहतूक नसलेल्या महामार्गांवर जाऊ शकतात.