गृहमंत्रालयाचा ऐतिहासिक निर्णय; आता तुम्ही कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी प्रादेशिक भाषांमध्येही परीक्षा देऊ शकाल…
कॉन्स्टेबल परीक्षा: CAPF मध्ये तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता कॉन्स्टेबल भरतीसाठी हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्येही पेपर तयार केले जातील.

ऋषभ | प्रतिनिधी
गृहमंत्रालयाचा ऐतिहासिक निर्णय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक निर्णय घेत गृह मंत्रालयाने CAPF साठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (GJ) परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे . CAPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी या भाषांमध्ये प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहे. याअंतर्गत लाखो उमेदवार त्यांच्या मातृभाषा आणि प्रादेशिक भाषेत परीक्षेला बसू शकतील, ज्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल.
हिंदी-इंग्रजीशिवाय या प्रादेशिक भाषांमध्ये पेपर तयार केले जातील
- आसामी
- बंगाली
- गुजराती
- मराठी
- मल्याळम
- कन्नड
- तमिळ
- तेलुगु
- ओडिया
- उर्दू
- पंजाबी
- मणिपुरी
- कोकणी
मातृभाषेत परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल
कॉन्स्टेबल (GD) ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेण्यात येणारी एक प्रमुख परीक्षा आहे, ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार बसतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, ही परीक्षा 01 जानेवारी 2024 पासून 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल. या निर्णयानंतर, राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारे स्थानिक तरुणांना त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करतील अशी अपेक्षा आहे.
उद्या ‘शाही’ सभा; लक्ष ‘म्हादई’वर!
गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी मानले गृहमंत्र्यांचे आभार
गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडल वरुन ट्विट करीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. डॉक्टर सावंत पुढे म्हणाले की कॉन्स्टेबल (GD) CAPF परीक्षा कोकणीसह इतर 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा हा ऐतिहासिक निर्णय. सीएपीएफमध्ये सामील होण्याची आकांक्षा असलेल्या स्थानिक तरुणांना निश्चितपणे प्रेरणा देणारा ठरेल.
गृहमंत्री अमित शाह रविवारी 16 एप्रिल 23 रोजी गोव्यात फोंडा येथील फार्मागुढी येथे सभेस संबोधित करतील आणि येणाऱ्या लोकसभेच्या तयारीची पाहणीही करतील. त्या दृष्टीने एकदिवस आधी घेतलेल्या ह्या निर्णयाने गोव्यात भाजपच्या आणि त्या अनुषंगाने गृहमंत्री शाह यांच्या एकंदरीत पुढील धोरणांना एक्स्ट्रा मायलेज नक्कीच मिळेल यात शंकाच नाही.